गोविंदाने दिलेली महागडी वस्तू झालेली गायब, घाबरलेली सुनीता आहुजा, मग घडलं असं काही
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 12:55 IST2025-10-21T12:54:39+5:302025-10-21T12:55:22+5:30
Govinda And Sunita Ahuja : सुनीता आहुजाने तिच्या नवीन व्लॉगमध्ये सांगितले की, तिची सॉलिटेअर अंगठी हरवली आहे, जी गोविंदाने तिला साखरपुड्याच्या वेळी भेट म्हणून दिली होती.

गोविंदाने दिलेली महागडी वस्तू झालेली गायब, घाबरलेली सुनीता आहुजा, मग घडलं असं काही
अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहूजा आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. तिने नुकतेच तिचे स्वतःचे यूट्यूब चॅनेल सुरू केले आहे, जिथे सुनीता लोकांना देवाचे दर्शन घडवते. ती वारंवार महाराष्ट्रातील मंदिरांना भेट देते आणि केवळ या मंदिरांची कथा आणि महत्त्व सांगते, असे नाही तर आजूबाजूच्या स्थानिक दुकानांमध्ये आणि भोजनालयात भोजनाचा आनंद देखील घेते. गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहूजा यांच्या घटस्फोटाच्या अफवा चर्चेत आल्या होत्या. मात्र, गणेश चतुर्थी उत्सवामध्ये एकत्र दिसल्याने त्यांनी या अफवा फेटाळून लावल्या. आता तिच्या यूट्यूब चॅनेलवर पोस्ट केलेल्या एका नवीन व्लॉगमध्ये, सुनीताने सांगितले आहे की, तिची सॉलिटेअर अंगठी हरवली आहे, जी गोविंदाने तिला साखरपुड्याच्या वेळी भेट म्हणून दिली होती.
सुनीता आहुजाने सांगितले, ''आज मी खूप तणावात आहे, माझा साखरपुड्याचा सॉलिटेअर मला कुठे ठेवला हे माहीत नाहीये. मी तीच शोधत आहे पण मला ती सापडत नाहीये. सगळ्यांची नजर तिच्यावरच होती, ती खूप महाग होती.'' त्यानंतर ती मुंबा देवीच्या मंदिरात गेली आणि तिने आशीर्वाद घेतला, तसेच आपली अंगठी परत मिळण्यासाठी प्रार्थना केली. नंतर, तिने सांगितले की अंगठी बॅगमध्येच होती आणि ती बाहेर काढायला विसरली होती.
गोविंदाच्या रक्षणासाठी सुनीताने मागितला आशीर्वाद
या दरम्यान ती मंदिराच्या आत दिसली, जिथे तिने आशीर्वाद मागितला आणि मग म्हणाली, ''खूप वर्षांपूर्वी मी गोविंदासोबत येथे दर्शनासाठी आले होते. आज खूप छान दर्शन झाले. माझ्या सुहागचे नेहमी रक्षण करते. माझा सुहाग माझाच राहील. चीची माझ्यावर खूप प्रेम करतो आणि जगात कोणीही येवो किंवा जावो पण आम्ही कधीच एकमेकांना सोडणार नाही.''
३८ वर्षांपूर्वी गोविंदा-सुनीताचं झालं लग्न
गोविंदा आणि सुनीताचे लग्न १९८७ मध्ये झाले होते. त्यांना दोन मुले आहेत टीना आहूजा आणि यशवर्धन आहूजा. गेल्या वर्षी गोविंदाला त्याच्या रिव्हॉल्व्हरमधून चुकून पायात गोळी लागली होती. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही महिन्यांनंतर, गोविंदा आणि सुनीता घटस्फोट घेणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या.