सोनाक्षी सिन्हाच्या वडिलांची भूमिका साकारणार सुनील शेट्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2017 17:44 IST2017-06-15T12:09:59+5:302017-06-15T17:44:05+5:30
बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाच्या वडिलांची भूमिका मोठ्या पडद्यावर सुनील शेट्टी साकारणार आहे.सोनाक्षी सिन्हाच्या आगामी चित्रपट सर्कसचे शूटिंग लवकरच ...

सोनाक्षी सिन्हाच्या वडिलांची भूमिका साकारणार सुनील शेट्टी
ब लिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाच्या वडिलांची भूमिका मोठ्या पडद्यावर सुनील शेट्टी साकारणार आहे.सोनाक्षी सिन्हाच्या आगामी चित्रपट सर्कसचे शूटिंग लवकरच सुरु होणार आहे. या चित्रपटात तिच्या वडिलांची भूमिका सुनील शेट्टी साकारणार आहेत. याचित्रपटाची कथा सर्कसवर आधारित आहे. सर्कस हा चित्रपट म्युझिकल ड्रामा आहे. यात सोनाक्षी सिन्हा ट्रंपीज आर्टिस्टची भूमिका साकारणार दिसणार आहे तर सुनील शेट्टी रिटायर्ड सर्कस आर्टिस्टच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी आधी कंगना रणौत आणि परिणीती चोप्राला विचारण्यात आले होते. मात्र नंतर सोनालीचे नाव फायनल करण्यात आले. हा चित्रपट बाप-मुलीच्या नात्यावर आधारित आहे. जे वडील आपले मुलीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेतात. हा चित्रपट बॉस्को मार्टिस दिग्दर्शित करतोय जो एक प्रसिद्ध कोरिऑग्राफर देखील आहे. सर्कसच्या माध्यमातून पहिल्यांदाच बॉस्को मार्टिस दिग्दर्शनात पदार्पण करतोय. सर्कसचे शूटिंग पुढच्या महिन्यापासून अमेरिकेत सुरु होणार आहे. याचित्रपटासाठी दोघे वर्कशॉपव्दारे आपली तयारी सुरु करणार आहेत. सोनाक्षीच्या वडिलांची भूमिका साकारण्यासाठी सुनील शेट्टी उत्सुक आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोनाक्षी एक हिट चित्रपटाच्या शोधात आहे. काही दिवसांपूर्वी आलेला नूर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला होता. याचित्रपटात तिने एक पत्रकाराची भूमिका साकारली होती. १९६९ साली प्रदर्शित झालेल्या ‘इत्तेफाक’ या चित्रपटाचा हा रिमेकमध्ये सुद्धा सोनाक्षी दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा झळकणार आहे. चित्रपटाची निर्मिती बी.आर. फिल्म्स, धर्मा प्रॉडक्शंस व शाहरुख खानचा रेड चिलीज इंटरटेनमेंट करीत आहे. दिग्दर्शनाची जबाबदारी बी.आर. चोपडा यांचा नातू अभय चोपडा करीत आहे.