तुम्ही सुनील शेट्टीचे फॅन आहात, मग ही बातमी वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 06:30 AM2019-07-26T06:30:00+5:302019-07-26T06:30:00+5:30

सुपरस्टार सुदीप आणि सुनील शेट्टी यांची मुख्य भूमिका असलेला झी स्टुडिओजचा एक्शन ड्रामा चित्रपट 'पहलवान' लवकरच प्रदर्शित होणार आ

Sunil shetty starrer pahalwan movie releases on 12th of September | तुम्ही सुनील शेट्टीचे फॅन आहात, मग ही बातमी वाचा

तुम्ही सुनील शेट्टीचे फॅन आहात, मग ही बातमी वाचा

googlenewsNext

सुपरस्टार सुदीप आणि सुनील शेट्टी यांची मुख्य भूमिका असलेला झी स्टुडिओजचा एक्शन ड्रामा चित्रपट 'पहलवान' लवकरच प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी चित्रपटाचा टीझर लॉन्च करण्यात आला होता तो प्रेक्षकांच्या पंसतीस उतरला आहे. हा चित्रपट १२  सप्टेंबर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा २५०० स्क्रीनवर प्रदर्शित होणार आहे. 

कृष्णा यांनी दिग्दर्शित स्वपन्ना कृष्णाद्वारे निर्मित आणि झी स्टुडिओजद्वारे प्रस्तुत, हा ऍक्शन ड्रामा चित्रपट हिंदी, कन्नड, तमिळ, तेलगू आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये प्रदर्शित केला जाईल. चित्रपटामध्ये ड्रामा ,एक्शन आणि विनोदांच्या मोठ्या प्रमाणावर तड़का लावण्यात आलेला आहे.

चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक कृष्णा म्हणाले, "या चित्रपटातील कथा प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करणारी आहे. आम्ही या चित्रपटाच्या प्रदर्शना बद्दल समाधानी आणि आनंदी आहोत, विशेषतः हा चित्रपट ५ भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे."


 सुनील शेट्टीने आपल्या करिअरमध्ये अनेक धडाकेबाज चित्रपट दिलेत. पण २००० सालानंतर त्याला चित्रपट मिळणे हळूहळू बंद झाले. आता तो अगदी एखाद्या चित्रपटात झळकतो. सध्या सुनील शेट्टी दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या एका बिग बजेट चित्रपटात काम करत आहे. याशिवाय ‘हेरा फेरी ३’ मध्ये पुन्हा एकदा अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी एकत्र येतील अशी चर्चा आहे.

Web Title: Sunil shetty starrer pahalwan movie releases on 12th of September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.