​‘सुल्तान’ सलमान खान पुन्हा एकदा गाजवणार ‘गामा’सह आखाडा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2017 12:47 IST2017-05-12T07:17:10+5:302017-05-12T12:47:10+5:30

‘सुल्तान’ या चित्रपटानंतर सलमान खान पुन्हा एकदा कुस्तीच्या आखाड्यात उतरण्यास तयार आहे. पण यावेळी मोठ्या पडद्यावर नाही तर छोट्या ...

'Sultan' Salman Khan will again play 'Gamma' with Akhaada! | ​‘सुल्तान’ सलमान खान पुन्हा एकदा गाजवणार ‘गामा’सह आखाडा !

​‘सुल्तान’ सलमान खान पुन्हा एकदा गाजवणार ‘गामा’सह आखाडा !

ुल्तान’ या चित्रपटानंतर सलमान खान पुन्हा एकदा कुस्तीच्या आखाड्यात उतरण्यास तयार आहे. पण यावेळी मोठ्या पडद्यावर नाही तर छोट्या पडद्यावर. होय, छोट्या पडद्यावर सलमान गामा पहेलवानची कथा घेऊन येतो आहे. अर्थात सलमान गामा पहेलवान बनणार नाही तर यावेळी सलमानचा भाऊ सोहेल खान या भूमिकेत दिसणार आहे.
सलमानच्या बॅनरखाली बनणा-या टीव्ही सीरिजमध्ये सोहेल खान गामा पहेलवानाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सीरिजचा एक पायलट एपिसोड तयार झाला असून तो एका बड्या चॅनलच्या सुपूर्द करण्यात आला आहे.



गामांचा जन्म इ.स. १८८२ मध्ये अमृतसरमध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मोहम्मद अजीज होते. वयाच्या दहाव्या वषार्पासून त्यांनी कुस्त्या खेळायला सुरुवात केली. वय एकोणीस असताना त्यांनी तत्कालीन भारतीय कुस्ती चॅम्पियन रहीम बख्श सुलतानीवालाला आव्हान दिले आणि त्याला कुस्तीत पराभूत केले. या कुस्तीनंतर गामांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली आणि त्यांचा दबदबा वाढला.त्यानंतर गामा पहेलवानाने जबरदस्त मेहनत सुरूच ठेवली व इ.स. १९१० पर्यंत भारतीय उपखंडातील तमाम पहेलवानांना कुस्तीत पराजित केले आणि निर्विवादपणे आपणच भारतीय कुस्तीचा चँपियन आहोत हे सिद्ध केले. त्यानंतर गामाने परदेशी जाऊन इंग्लंडमध्ये कुस्त्यांच्या दंगलीत भाग घ्यायला सुरुवात केली, आणि जागतिक चँपियन असलेल्या पोलंडच्या स्टॅनिस्लॉस बाइज्का या पहेलवानाला कुस्तीसाठी आमंत्रित केले. 



त्यानंतर गामा भारतात परत आले. आल्यावर त्यांनी परत एकदा रहीम बख्श सुलतानीवालाशी कुस्ती केली, त्याच्यावर जय मिळवला, आणि आपल्याला यापूर्वीच मिळालेला रुस्तुमे हिंद हा किताब कायम ठेवला. गामाने आपल्या पन्नास वर्षाच्या कारकिर्दीत सुमारे पाच हजार कुस्त्या केल्या आणि त्या एकूणएक कुस्त्यांत तो एकदाही हरला नाही. भारताच्या फाळणीनंतर गामा पाकिस्तानला जाऊन स्थिरस्थावर झाले. तिथे त्यांचा मृत्यू इ.स. १९६० मध्ये झाला.

Web Title: 'Sultan' Salman Khan will again play 'Gamma' with Akhaada!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.