‘सुल्तान’सोबत ‘बेफिक्रे’चा टिजर?
By Admin | Updated: June 22, 2016 01:35 IST2016-06-22T01:35:27+5:302016-06-22T01:35:27+5:30
रणवीर सिंगचे चाहते त्याला ‘बाजीराव मस्तानी’नंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी खूप उत्सुकत आहेत. त्यासाठी त्यांना वर्षाच्या अखेरपर्यंत वाट पाहावी लागणार.

‘सुल्तान’सोबत ‘बेफिक्रे’चा टिजर?
रणवीर सिंगचे चाहते त्याला ‘बाजीराव मस्तानी’नंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी खूप उत्सुकत आहेत. त्यासाठी त्यांना वर्षाच्या अखेरपर्यंत वाट पाहावी लागणार. पण सगळं जर व्यवस्थित झाले तर सलमान खानच्या ‘सुल्तान’सोबत रणवीर-वाणी कपूर स्टारर ‘बेफिक्रे’चा टिजर दाखविण्यात येणार असल्याची चर्चा आहे. असे झाले तर एक आगळावेगळा योगायोग जुळून येईल. कारण ‘सुल्तान’ ६ जुलै रोजी रिलीज होत आहे आणि त्याच दिवशी रणवीरचा वाढदिवस आहे. आपल्या बर्थडेच्या दिवशी चाहत्यांना पुढच्या चित्रपटाची झलक दाखविण्याची त्याची इच्छा आहे. जसे की आम्ही यापूर्वी सांगितले आहे, ‘बेफिक्रे’मध्ये शाहरुखही पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसू शकतो.