तेलगू अभिनेता विजय साई याची गळफास लावून आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 15:19 IST2017-12-12T09:49:04+5:302017-12-12T15:19:04+5:30
तेलगु चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रीय अभिनेता विजय साई याने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. हैदराबादेतील युसुफगडास्थित अपार्टमेंटमध्ये त्याला ...

तेलगू अभिनेता विजय साई याची गळफास लावून आत्महत्या
त लगु चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रीय अभिनेता विजय साई याने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. हैदराबादेतील युसुफगडास्थित अपार्टमेंटमध्ये त्याला मृतदेह आढळून आला. ३८ वर्षीय विजय साईने कथितरित्या पत्नीच्या जाचाला कंटाळून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे कळते. पोलिसांनी याप्रकरणी विजयची पत्नी वनिता व अन्य दोघांविरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांपासून विजय पत्नीपासून वेगळा राहत होता. अलीकडे पत्नीने विजयविरोधात घरगुती हिंसाचाराची केस दाखल केली होती.या काळात त्याच्याकडे कुठलाही चांगला चित्रपट नव्हता. विजयच्या आत्महत्येनंतर केलेल्या तपासादरम्यान पोलिसांना त्याच्या मोबाईलमध्ये एक क्लिप मिळाली आहे. ही क्लिप विजयने आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केली आहे. या क्लिपमध्ये विजयने पत्नी व अन्य दोघांना त्याच्या आत्महत्येसाठी जबाबदार धरले आहे. पत्नी व अन्य दोघांनी आपल्याकडे ३ कोटी रूपयांसाठी तगादा लावला होता, असा दावा विजयने या व्हिडिओत केला आहे.
विजयच्या कुटुंबीयांनी सांगितल्यानुसार, पत्नीसोबतचा वाद आणि काम मिळत नसल्याने विजय तणावात होता. सोमवारी सकाळी साडे नऊ वाजता विजय आपल्या खोलीत गेला आणि दरवाजा आतूर बंद करून घेतला. काही वेळानंतर विजयच्या आईने दरवाजा ठोठावला असता आतून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.कुटुंबीयांनी दरवाजा तोडून आत बघितले असता विजयचा मृतदेह पंख्याला लटकलेला त्यांना दिसला.
२००१ मध्ये विजय साईने तेलगू इंडस्ट्रीत एन्ट्री केली होती. बोम्मारिल्लू, अम्मायिलू, अब्बायिलू अशा अनेक हिट चित्रपटात त्याने काम केले.