​सुहाना खानच्या ‘या’ टी शर्टची किंमत जाणून व्हाल थक्क !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 14:58 IST2017-11-02T08:15:00+5:302017-11-02T14:58:49+5:30

किंग खान शाहरूखची मुलगी सुहाना खान सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते.कधी तिच्या ग्लॅमरस अंदाजामुळे तर कधी तिच्या बॉलिवूड पदार्पणाच्या ...

Suhana Khan's 'T-shirt' will be worth the price! | ​सुहाना खानच्या ‘या’ टी शर्टची किंमत जाणून व्हाल थक्क !

​सुहाना खानच्या ‘या’ टी शर्टची किंमत जाणून व्हाल थक्क !

ंग खान शाहरूखची मुलगी सुहाना खान सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते.कधी तिच्या ग्लॅमरस अंदाजामुळे तर कधी तिच्या बॉलिवूड पदार्पणाच्या चर्चेमुळे ती सतत चर्चेत असते.जिथे जिथे किंग खान शाहरुखची चर्चा होते तिथे सुहानाचा विषय नाही निघाला तरच नवल.सोशल मीडियावरही शाहरुखसह सुहाना हा मुद्दा नेहमीच गाजतो.सोशल मीडियावर कधी सुहानाचे फोटो व्हायरल होतात तेव्हा अनेक नेटीझन्स तिला लाईक्स कमेंटस देताना दिसतात.यावेळीही सुहाना चर्चेत आहे याला असे दुसरे तिसरे असे काही खास कारण नाहीय.यावेळीही एका  फोटोमुळे सुहानावर चर्चा रंगतेय.होय,एका ठिकाणी सुहाना मीडियाच्या कॅमे-यात कैद झाली.त्यावेळी सुहानाचा स्टायलिश अंदाज पाहायला मिळाला.आता बादशाह शाहरुखची लेक म्हणजे तिचा औरा काही औरच असणार नाही का? सुहानाने यावेळी पांढरा रंगाच टीशर्ट घातला होता.गोल्डन रंगाचे शूजही घातले होते.यावेळी सुहानाने घातलेल्या पांढ-या रंगाच्या टी-शर्टचीच जास्त चर्चा होत आहे.या एका टी-शर्टची किंमत जवळपास 64,000रू.इतकी असल्याचेही माहिती मिळतेय.त्यामुळे बॉलिवूड पदार्पणापूर्वीच सुहाना प्रकाशझोतात आली आहे.

जान्हवी कपूर आणि सारा अली खान या दोघींच्या नावाप्रमाणे सुहाना बॉलिवूडमध्ये डेब्यु करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.बॉलिवूडचा डॅडी दिग्दर्शक करण जोहरच्या सिनेमातून बादशाहची लेक रुपेरी पडद्यावर अवतणार असल्याचं बोललं जातंय. किंग खान शाहरुखनं त्याचा खास मित्र करणला यासाठी विशेष गळ घातली  असून लाडक्या लेकीसाठी खास स्क्रीप्ट तयार करण्यास सांगितल्याचं बोललं जातंय.सुहानाच्या रक्तातच अभिनय असल्यामुळे आपल्या वडिलांप्रमाणेच सुहानाही बॉलिवूड गाजवेल अशा बॉलिवूडकरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले मत मांडले आहे.स्टायलिश लूकमुळे सध्या जान्हवी कपूर,सारा खान आणि सुहाना खान या स्टारकिडसचा फॅशन सेन्स आणि त्यांचा स्टायलिश अंदाज आघाडीच्या अभिनेत्रींनाही मागे टाकेल असाच असतो.त्यामुळे एकूणच  सेलिब्रिटी किड्स देखील सेलिब्रिटींपेक्षा कमी नाहीत हेच यावरून पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे.

Web Title: Suhana Khan's 'T-shirt' will be worth the price!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.