‘प्रेम रतन धन पायो’चे यश सलमानमुळे- बडजात्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 07:31 IST2016-01-16T01:13:30+5:302016-02-09T07:31:24+5:30
रा जश्री प्रोडक्शन या बॅनरखाली सलमान खानने अनेक चित्रपट साकारले. पण राजश्री बॅनर त्याच्यासोबत काम करण्याची एकही संधी सोडत ...
.jpg)
‘प्रेम रतन धन पायो’चे यश सलमानमुळे- बडजात्या
र जश्री प्रोडक्शन या बॅनरखाली सलमान खानने अनेक चित्रपट साकारले. पण राजश्री बॅनर त्याच्यासोबत काम करण्याची एकही संधी सोडत नाही. राजेश्री प्रोडक्शनचा नुकताच रिलीज झालेला चित्रपट 'प्रेम रतन धन पायो' ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या यादीत समाविष्ट झाला आहे. रज्जित बडजात्या म्हणाला,' सलमानसोबत आमची भावनिक गुंतागुंत आहे. तो आमच्या घरातील एक सदस्य आहे. आम्ही त्याला 'मैंने प्यार किया' मधून प्रकाशझोतात आणले. त्यामुळे त्याच्यासोबत काम करण्याची एकही संधी आम्ही सोडणार नाही. ' चित्रपट आणि कथा यांच्यावर सर्व अवलंबून असते. विवाहसाठी एखाद्या चित्रपटाला शाहीद कपूर सारखा कलाकार लागतो. पण 'प्रेम रतन धन पायो' सारख्या चित्रपटाला सुपरस्टार सलमानसारखाच सर्मथ खांदा लागतो.

