​चित्रपटांनीही उचलून धरला समलैंगिकतेचा विषय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2016 09:47 IST2016-02-23T16:47:12+5:302016-02-23T09:47:12+5:30

येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणारा हंसल मेहता यांचा ‘अलीगड’हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. यात समलैंगिगतेसारखा संवेदनशील विषयाला स्पर्श करण्यात आला ...

The subject of homosexuality was lifted by the movies | ​चित्रपटांनीही उचलून धरला समलैंगिकतेचा विषय

​चित्रपटांनीही उचलून धरला समलैंगिकतेचा विषय

त्या शुक्रवारी प्रदर्शित होणारा हंसल मेहता यांचा ‘अलीगड’हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. यात समलैंगिगतेसारखा संवेदनशील विषयाला स्पर्श करण्यात आला आहे. मनोज वाजपेयी आणि राजकुमार रावची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट अलिगड युनिव्हर्सिटीच्या एका प्राध्यापकाच्या जीवनावर आधारित आहे. हा विषय फारच संवेदनशिल असल्याने यावर फार चित्रपट आले नाहीत. आतापर्यंत केवळ ४७ चित्रपट असे आले आहेत ज्यात हा विषय अधोरेखित करण्यात आला आहे.



मात्र हा आकडा वेगवेगळ्या भाषांमध्ये बनलेल्या चित्रपटांचा आहे. या चित्रपटात बांगला चित्रपटांचे प्रमाण जास्त आहे. ४७ चित्रपटातून दहा पेक्षा जास्त चित्रपट फक्त बांगला भाषेतील आहेत. बॉलिवूडच्या बाबतीत सांगायचे झाले तर या विषयाची चर्चा तेव्हा झाली होती, जेव्हा दीपा मेहताचा ‘फायर’ चित्रपट प्रदर्शित होणार होता आणि धार्मिक संघटनांच्या विरोधावरुन या चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिंसात्मक विरोधाचा सामना करावा लागला होता. शबाना आजमी आणि नंदिता दासची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात सासू आणि सूनेतील लेस्बियन नात्याच्या कथेला आपल्या समाजाने स्वीकारणे कठीण होते. यामुळे याचा मोठा विरोध झाला आणि चित्रपटाला जास्त यश मिळाले नाही.

९० च्या दशकात कोणताच मोठा चित्रपट या विषयावर बनला नाही. स्प्लिट वाईड ओपनमध्ये राहुल बोस अशा भूमिकेत दिला. स्वत: या नात्याला  मानणाºया ओनीर यांनी चित्रपट ‘आईएम’च्या चार कथेमधून एक कथा या विषयावरुन बनविली. करण राजदान निर्देशित ‘गर्लफ्रेंड’ (ईशा कोप्पीकर आणि अमृता अरोडा) मध्ये लेस्बियन नात्याला दाखविण्याचा प्रयत्न झाला. मात्र करण राजदान यात जरा कमी पडले. गदर फेम दिग्दर्शक अनिल शर्माचा सर्वात लहान भाऊ कपिल शर्मा चा चित्रपट ‘डोंट नो...’ मध्ये या विषयाला काही प्रमाणात दाखविण्यात आले. मात्र अनोळखी चेहºयांमुळे हा चित्रपट चर्चेत  आलाच नाही. करण जौहरच्या ‘दोस्ताना’मध्ये अभिषेक आणि जॉन अब्राहमला या नात्याशी जोडण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्यात विनोदच जास्त होता.  

Web Title: The subject of homosexuality was lifted by the movies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.