स्टाइल हे व्यक्त होण्याचे माध्यम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2016 05:31 IST2016-02-23T08:19:39+5:302016-02-23T05:31:35+5:30
अभिनेता रवणीर सिंग याच्या मते स्टाइल ही व्यक्त होण्याचे माध्यम आहे. यातून तुमचा स्वभाव, आवडीनिवडीौ मूड यांचे प्रतिबिंब उमटते. ...

स्टाइल हे व्यक्त होण्याचे माध्यम
माझ्या मूडनुसार मी माझा पोशाख घालीत असतो. लोक माझ्या पोशाखाकडे फार लक्ष देतात, याची मला माहिती नव्हती. मी माझ्या आवडीसाठी पोशाखाची निवड करीत असतो. त्यात विविधता असते. नवनवीन पोशाख वापरण्याचेही प्रयोग करीत असतो. माझा मूड त्यातून व्यकत करण्याचा माझा प्रयत्न असतो, असेही तो म्हणाला.
याबाबतीत सर्वाधिक स्टायलिश व्यक्तिमत्व कोण वाटते, या प्रश्नावर रणवीर म्हणाला, अमिताभ बच्चन यांचा क्रमांक सर्वांत वर लागतो. त्यापाठोपाठ करण जोहर आणि इम्रान खान यांचे नाव येते. अभिनेत्रींमध्ये दीपिका पदुकोन आणि कंगणा रानावत यांचे नाव घेता येईल. पोशाखांबद्दलची त्यांची समज मला प्रभावित करते.