​हनी की कहाणी, विनील की जुबानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2016 22:10 IST2016-04-03T05:09:22+5:302016-04-02T22:10:58+5:30

अल्पावधीतच प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचलेला हिंदी रॅपर आणि संगीतकार यो यो हनी सिंग गेली दीड वर्षे गायब होता. त्याच्या अनुपस्थितीची ...

The story of Honey, the affair of Vinyl | ​हनी की कहाणी, विनील की जुबानी

​हनी की कहाणी, विनील की जुबानी

्पावधीतच प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचलेला हिंदी रॅपर आणि संगीतकार यो यो हनी सिंग गेली दीड वर्षे गायब होता. त्याच्या अनुपस्थितीची अनेक कारणे सांगण्यात आली.

तो व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेत आहे, असेदेखील म्हटले गेले. पण सत्य काय आहे कुणालाच माहित नव्हते.

मात्र, आता पुन्हा यो यो म्हणत हनी सिंग ‘झोरावर’ चित्रपटातून पुनरागमन करत आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक विनील मार्कन याने हनीच्या गायब होण्याचे कारण स्पष्ट केले.

तो म्हणाला, हनी सिंग ’बायपोलर डिसआॅर्डर’शी सुमारे 18 महिन्यांचा लढा देऊन बरा झाला आहे. या दरम्यान तो नोएडा येथील घरी उपचार घेत होता. हा काळ त्याच्या आयुष्यातील सर्वात खडतर होता.

हनी सिंग सेलिब्रेटी असल्यामुळे त्याच्याविषयी अफवा पसरणे स्वभाविक आहे. पण तो नशेच्या आहारी गेला नव्हता. फार जिद्दीने आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्याने बायपोलर डिसआॅर्डरवर मात केली आहे. तो पुन्हा येतोय म्हटल्यावर चाहते तर खूप झाले आहेत. यापुढे आपल्या सर्वांना एक नवीन हनी सिंग दिसणार, असे विनील म्हणाला.

कॉकटेलमधील ‘मैैं शराबी’ आणि ‘अंग्रेजी बीट’ या गाण्यांच्या तुफान यशानंतर हीट गाण्यांची शंभर टक्के खात्री म्हणून हनी सिंगचे किमान एक तरी गाणे चित्रपटात असावे असा प्रघातच बॉलीवूडमध्ये मध्यंतरी पडला होता. ‘ पार्टी विथ भूतनाथ’, ‘चार बोतल वोडका’, ‘पार्टी आॅल नाईट’ यासांरखी एकाहून एक सुपरहीट गाणी त्याने दिली.

तो पूर्णपणे बरा होऊन परत यावा अशी आमचीसुद्धा इच्छा आहे.

Web Title: The story of Honey, the affair of Vinyl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.