राम लखनच्या रिमेकला घेऊन करण जोहरने केले हे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2017 16:24 IST2017-11-07T10:54:47+5:302017-11-07T16:24:47+5:30
कालीचरण, हीरो, राम लखन, सौदागर, खलनायक सारख्या बॉलिवूडला सुपरहिट चित्रपट तयार करणाऱ्या सुभाष घाई यांच्या राम लखन चित्रपटाचा रिमेक ...

राम लखनच्या रिमेकला घेऊन करण जोहरने केले हे वक्तव्य
क लीचरण, हीरो, राम लखन, सौदागर, खलनायक सारख्या बॉलिवूडला सुपरहिट चित्रपट तयार करणाऱ्या सुभाष घाई यांच्या राम लखन चित्रपटाचा रिमेक तयार होणार नाही आहे. फिल्ममेकर करण जौहर या चित्रपटाचा रिमेक तयार करण्याचा विचार करत होता. या गोष्टीचा खुलासा काही दिवसांपूर्वी स्वत: करण जोहरने केला होता. त्यानंतर प्रेक्षक खूप खूश देखील झाले होते. मात्र बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार आता राम लखनचा रिमेक तयार करणार नाही आहे.
करणचे म्हणणे आहे की, कोणत्याही मोठ्या चित्रपटाचा रिमेक बनवताना त्याची स्क्रिप्ट आणि स्टारकास्ट सुद्धा तेवढीच दमदार लागते, ते जमवताना नाकी नऊ येतात. त्यामुळे अशा चित्रपटाचा रिमेक बनवण्याचा विचार मी बंद केला आहे. आधीच्या राम लखनमध्ये जॅकी श्रॉफ, अनिल कपूर, माधुरी दीक्षित आणि डिम्पल कपाडिया यांच्या मुख्य भूमिका होत्या.
करण जोहर ब्रह्मस्त्र चित्रपटाची निर्मिती करतो आहे. याची माहिती स्वत: करण जोहरने ट्वीटरवरुन दिली होती. याचा पहिला भाग १५ ऑगस्ट २०१९ ला रिलीज केला जाणार आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चन दिसणार आहेत. आलिया आणि रणबीर पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. या चित्रपटासाठी रणबीरने घोडेस्वारी आणि जिम्नॅस्टिकची ट्रेनिंग घ्यायला सुरुवात सुद्धा केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी करतो आहे. या चित्रपटाचे नाव आधी 'ड्रॅगन' असे होते. अयान मुखर्जी भरपूर दिवसांपासून या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करत होते . ज्यामध्ये एक सुपरहिरो आहे आणि त्याच्याकडे अद्नभुत शक्ति आहे. या कथेला अनुसरून करण जोहरने या चित्रपटाचे नाव 'ब्रह्मस्त्र' असे ठेवले आहे. हा चित्रपट ३ भागात तयार करण्यात येणार आहे.
काही दिवसांपूर्वी करण जोहर प्रभासला बॉलिवूडमध्ये लाँच करणार असल्याची देखील बातमी आली होती. पण प्रभासने म्हणे, या प्रोजेक्टसाठी २० कोटी रूपयांची मागणी केली. ही रक्कम ऐकून करण जोहरची बोलतीच बंद झाली.
ALSO READ : या अभिनेत्रीमुळे करण जोहरने आजवर केले नाही लग्न