​क्रिती सॅननचे हे वाक्य सुशांतसोबतच्या ब्रेकअपकडे इशारा करणारे तर नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2017 13:30 IST2017-03-27T08:00:06+5:302017-03-27T13:30:06+5:30

अलीकडे एका बॉलिवूड ब्रेकअपची बातमी आली. ही बातमी होती, सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री क्रिती सॅनन यांच्या ब्रेकअपची. या ...

This statement from Krypton Sanan is not to point to the breakup with Sushant? | ​क्रिती सॅननचे हे वाक्य सुशांतसोबतच्या ब्रेकअपकडे इशारा करणारे तर नाही?

​क्रिती सॅननचे हे वाक्य सुशांतसोबतच्या ब्रेकअपकडे इशारा करणारे तर नाही?

ीकडे एका बॉलिवूड ब्रेकअपची बातमी आली. ही बातमी होती, सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री क्रिती सॅनन यांच्या ब्रेकअपची. या बातमीवर अद्याप सुशांत वा क्रिती या दोघांपैकी कुणीही खुलासा केला नाही. पण क्रितीने मात्र फारपूर्वीच याचे संकेत दिले होते, हे आता लक्षात येतय. होय, एका लोकप्रीय मॅगझिनच्या एप्रिल महिन्याच्या अंकासाठी क्रितीने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत क्रितीने प्रोफेशनल लाईफपासून पर्सनल लाईफपर्यंतचे अनेक खुलासे केले आहेत.



ALSO READ : ​अंकितानंतर क्रिती सॅननसोबतही सुशांतसिंह राजपूतचे ब्रेकअप!

 मुलाखतीमध्ये क्रितीला तिच्या आणि सुशांतसिंग राजपूतच्या नात्याविषयीही प्रश्न करण्यात आला. त्यावर क्रिती चांगलेच गर्भित बोलून गेली.तुम्ही ठरवून कोणत्याही नात्याची सुरुवात करु शकत नाही, ते नाते जपू शकत नाही. इतरांशी तुम्ही जोडले जालच असे नाही. सध्यातरी मी  सिंगलच आहे. मी कोणालाही डेट करत नाहीये. पण, इंडस्ट्रीतील कोणा एका व्यक्तीला डेट करण्यास माझी काहीच हरकत नाही. माझ्या प्रियकराने माझे प्रोफेशनल आयुष्य समजून घेतले पाहिजे.  हे तेव्हाच शक्य होऊ शकते ज्यावेळी ती व्यक्ती तुमच्या प्रोफेशनचाच एक भाग असते, असे क्रिती यावेळी म्हणाली. क्रितीचे हे वाक्य सुशांतकडे इशारा करणारे आहे, असेच सध्या तरी वाटतेय. आता खरे काय ते क्रितीच जाणो. 
 बॉलिवूडमध्ये आल्यावर कुठल्या एका गोष्टीची खंत लागून राहते, असा एक प्रश्नही क्रितीला विचारला गेला. यावर ती म्हणाली, घराबाहेर पडून कधीकधी  पाणीपुरी खायची असते. मनसोक्त शॉपिंग करायची असते. पण आता एकटे बाहेर पडता येत नाही.  कधीकधी ही खंत वाटते. या गर्दीत सगळे तुमच्या अवतीभवती असतात. पण तरिही तुम्ही एकटे असता.

Web Title: This statement from Krypton Sanan is not to point to the breakup with Sushant?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.