धूम-४ ची स्टारकास्टच बदलली, हे आहेत नवीन स्टार्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2017 20:20 IST2017-01-14T20:17:22+5:302017-01-14T20:20:31+5:30

बॉलिवूडमध्ये कधी काय होईल हे सांगणे मुश्किल आहे. कारण एखादी घटना घडल्यानंतर त्याची इतरांना खबर लागेपर्यंत त्या घटनेतील विषय ...

Starlight of Dhoom-4 has changed, these are the new stars ... | धूम-४ ची स्टारकास्टच बदलली, हे आहेत नवीन स्टार्स...

धूम-४ ची स्टारकास्टच बदलली, हे आहेत नवीन स्टार्स...

लिवूडमध्ये कधी काय होईल हे सांगणे मुश्किल आहे. कारण एखादी घटना घडल्यानंतर त्याची इतरांना खबर लागेपर्यंत त्या घटनेतील विषय संपुष्टात आलेला असतो. असेच काहीसे यशराजच्या धूम सिरिजच्या चौथ्या भागाबाबत घडले आहे. म्हणे या या भागात संंपूर्ण जुनी स्टारकास्ट बदलण्यात आली असून, नवे चेहरे प्रेक्षकांना बघावयास मिळणार आहेत. 



आतापर्यंत धूम सिरीजमध्ये केवळ खलनायकाचे पात्र बदलण्यात आले आहेत. पहिल्या भागात जॉन अब्राहम, दुसºया भागात हृतिक रोशन, तर तिसºया भागात मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान याने खलनायकाची भूमिका साकारली होती. मात्र इन्स्पेक्टर जय म्हणजेच अभिषेक बच्चन आणि लकी (उदय चोपडा) यांचे पात्र तिन्ही भागात कायम होते.



त्यानुसार चौथ्या भागात केवळ खलनायकाचे पात्र बदलले जातील बाकी पात्र कायम राहतील असे सुरुवातीला बोलले जात होते. सुरुवातीला आलेल्या माहितीनुसार खलनायकाच्या भूमिकेसाठी सलमान खान याच्या नावावर शिक्कामोर्तबही करण्यात आल्याचे स्पष्ट केले गेले. मात्र खलनायकाची भूमिका साकारण्यास सलमानने सपशेल नकार दिल्याने यशराज बॅनरने सिनेमातील सर्वच पात्र बदलल्याची माहिती आता समोर आली आहे. 



त्याचबरोबर सलमानची जागा आता शाहरूख खान घेणार असल्याचेही जवळपास स्पष्ट झाले आहे, तर पहिल्या तिन्ही सिरीजमध्ये इन्स्पेक्टर जयची भूमिका साकारणाºया अभिषेक बच्चन याची जागा रणवीर सिंह घेणार आहे. त्यामुळे धूमचा चौथा भाग हा सर्वच अंगाने प्रेक्षकांसाठी स्पेशल ठरेल हे नक्की. 
दरम्यान, शाहरूखने यापूर्वीदेखील खलनायकाच्या भूमिका साकारलेल्या आहेत. डॉन, बाजीगर, डर यांसारख्या सिनेमांमधून त्याने प्रेक्षकांच्या मनात भीती निर्माण केली होती. त्यामुळे जर धूम चारमध्ये त्याचे नाव निश्चित झाल्यास प्रेक्षकांना पहिल्यांदाच शाहरूख-रणवीरची जोडी बघायवास मिळणार आहे. 

Web Title: Starlight of Dhoom-4 has changed, these are the new stars ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.