स्टारडॉटर्समध्ये सुरू आहे टसन, पहा लेटेस्ट फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2017 14:38 IST2017-08-22T08:56:26+5:302017-08-22T14:38:24+5:30

बॉलिवूडमध्ये सध्या सर्वत्र स्टारडॉटर्सचा जलवा बघावयास मिळत आहे. एकीकडे सैफ अली खान आणि अमृतासिंगची मुलगी सारा अली खान आणि ...

StarDotter launches Tusson, see latest photo! | स्टारडॉटर्समध्ये सुरू आहे टसन, पहा लेटेस्ट फोटो!

स्टारडॉटर्समध्ये सुरू आहे टसन, पहा लेटेस्ट फोटो!

लिवूडमध्ये सध्या सर्वत्र स्टारडॉटर्सचा जलवा बघावयास मिळत आहे. एकीकडे सैफ अली खान आणि अमृतासिंगची मुलगी सारा अली खान आणि श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर यांच्या बॉलिवूडमध्ये चर्चा रंगत असताना, शाहरूख खानची मुलगी सुहाना खान, चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे आणि संजय कपूरची मुलगी शनाया कपूर यांनी त्यांच्या ग्लॅमरस अंदाजाने धूम उडवून दिली आहे. वास्तविक यातील एकीनेही अद्यापपर्यंत बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले नाही. परंतु ग्लॅमर, सौंदर्य आणि स्टाइलच्या जोरावर या स्टारडॉटर्सला बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्रींप्रमाणेच स्टारडम मिळत आहे. गेल्या काही दिवसांमधील त्यांच्या अदा जर तुम्ही बघितल्या तर जणूकाही या एकमेकींना टसन तर देत नसाव्यात ना? असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. फोटो पहा तुमच्याही लक्षात येईल. 







श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर
गेल्या रविवारी बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी हिचा बर्थ डे सेलिब्रेट करण्यात आला. यावेळी श्रीदेवीचा संपूर्ण परिवार उपस्थित होता. मात्र यात सर्वाधिक लक्षनिय ठरली ती श्रीदेवीची मोठी मुलगी जान्हवी कपूर. पार्टीत जान्हवीचा अंदाज थक्क करणारा आहे. सिल्व्हर रंगाच्या टॉपमध्ये जान्हवीचे रूप खूपच खुलून दिसत होते. जान्हवी लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार असून, ती कुठेही स्पॉट झाली तरी तिचे फोटोज् सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत असतात. 







सारा अली खान

गेल्या बुधवारी सैफ अली खान याने त्याचा ४७ वा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याच्या पहिल्या पत्नीचा मुलगा इब्राहिम खान आणि मुलगी सारा अली खान उपस्थित होते. जेव्हा हे दोघे भाऊ-बहीण पार्टीत पोहोचले तेव्हा त्यांचे फोटोज् सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. यावेळी साराने शोल्डर टॉप, मॅचिंग हॉट पॅण्ट आणि हाय डेनिम बूट्स परिधान केले होते. यामध्ये सारा खूपच सुंदर दिसत होती. सारा ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करीत आहे. 







शाहरूखची मुलगी सुहाना खान
गेल्या शनिवारी लॅक्मे फॅशन वीकमध्ये आयोजन करण्यात आलेल्या सुपरड्राय इंडिया पार्टीत शाहरूख खानची मुलगी सुहाना खान उपस्थित होते. आपल्या मित्रांसोबत आलेली सुहाना तिच्या ग्लॅमर अंदाजामुळे सगळ्यांमध्ये उठून दिसत होती. ब्लॅक रंगाचा हाफ स्लीव्ज टॉप आणि व्हाइट रंगाच्या टाइट जीन्समध्ये सुहाना खूपच सुंदर दिसत होती. तिचे सौंदर्य एखाद्या सुपरस्टार्ससारखे दिसत होते. सुहाना सध्या तिचे शिक्षण पूर्ण करीत असून, भविष्यात तीदेखील अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे. 







चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे
इन्स्टाग्रामवर आपल्या सौंदर्याच्या अदा दाखविणारी चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे हीदेखील बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज आहे. काही दिवसांपूर्वीच ती शाहरूखची मुलगी सुहानासोबत लॅक्मे फॅशन वीकमध्ये बघावयास मिळाली होती. शोल्डर व्हाइट कलरच्या लाइनिंक टॉप आणि जीन्समध्ये अनन्या खूपच सुंदर दिसत होती. काही दिवसांपूर्वी तिला निर्माता फराह खानने डीएनए टेस्ट करण्याचा सल्ला दिल्याने ती चर्चेत आली होती. 







संजय कपूरची मुलगी शनाया कपूर
संजय कपूर आणि ज्वेलरी डिझायनर माहिप कपूर यांची मुलगी शनाया कपूर हीदेखील सध्या बॉलिवूड डेब्यूमुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर तिचे सातत्याने फोटोज् व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वी ती सोहेल खानचा मुलगा निर्वाण याच्यासोबत स्पॉट झाली होती. त्याचबरोबर सुहाना आणि अनन्यासोबत ती लॅक्मे फॅशन वीकमध्येदेखील सहभागी झाली होती. शनाया खूपच स्टायलिश असून, आपल्या याच अंदाजामुळे ती चर्चेत असते. 

Web Title: StarDotter launches Tusson, see latest photo!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.