मित्रांसाठी सुहाना खानने वडिलांशीच घेतलं वैर, स्टारकिड्सचा सिनेमा 'द आर्चीज' चा ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 01:45 PM2023-11-09T13:45:48+5:302023-11-09T13:47:24+5:30

रोमान्स, मैत्री, म्यूझिक, डान्स आणि मस्ती असा सर्वच मसाला सिनेमात पाहायला मिळणार आहे.

Star kids movie The Archies Trailer released starring Suhana Khan Kushi Kapoor and Agastya Nanda | मित्रांसाठी सुहाना खानने वडिलांशीच घेतलं वैर, स्टारकिड्सचा सिनेमा 'द आर्चीज' चा ट्रेलर रिलीज

मित्रांसाठी सुहाना खानने वडिलांशीच घेतलं वैर, स्टारकिड्सचा सिनेमा 'द आर्चीज' चा ट्रेलर रिलीज

झोया अख्तर (Zoya Akhtar) दिग्दर्शित 'द आर्चीज' (The Archies) चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाची चर्चा होती. याचं कारण म्हणजे सिनेमातून स्टारकिड्स पदार्पण करत आहेत. शाहरुख खानची लाडकी सुहाना खान (Suhana Khan) , श्रीदेवीची धाकटी लेक खुशी कपूर (Khushi Kapoor) आणि अमिताभ बच्चन यांचा नातू श्वेता नंदाचा मुलगा अगस्त्य नंदा (Agastya Nanda) हे तिघेही पदार्पण करत आहेत. ट्रेलरची कथा ही 60 च्या दशकातील असून सर्वच यामध्ये हायस्कूलमधील विद्यार्थ्यांची भूमिका साकारत आहेत. 

रोमान्स, मैत्री, म्यूझिक, डान्स आणि मस्ती असा सर्वच मसाला सिनेमात पाहायला मिळणार आहे. अमेरिकी कॉमिक बुक सीरिज 'द आर्चीज' सिनेमाची कहाणी आधारित आहे. पोर्तुगीजपासून गोव्याला स्वातंत्र्य मिळाले इथपासून ट्रेलरची सुरुवात होते. ट्रेलर तुम्हाला 1960 च्या दशकात घेऊन जाते. इतक्या वर्षांपूर्वीची कहाणी आहे म्हणल्यावर दृश्य, कॉस्च्युमही तसेच आहेत. सहा मित्रमैत्रिणींची ही कहाणी आहे. टीएनएज रोमान्स, भांडणं असं सगळंच त्यांच्यात घडताना दिसणार आहे. हे सहाही मित्र त्यांचं लहानपणीपासूनचं एक पार्क वाचवण्यासाठी लढतात. यामध्ये सुहाना जी व्हेरोनिकाच्या भूमिकेत आहे तिचे वडीलच त्या पार्कवर कब्जा करतात. तिथे त्यांना बांधकाम करायचं असतं. तेव्हा व्हेरॉनिका मित्रांसाठी आपल्या वडिलांच्याही विरोधात गेल्याचं दिसून येतं. खुशी, सुहाना आणि अगस्त्य या स्टारकिड्समध्ये आता कोण बाजी मारतं, प्रेक्षकांना कोणाचं काम आवडतं हे तर सिनेमा रिलीज झाल्यावरच कळेल.

फुल ऑन ड्रामा आणि श्रीमंतांच्या कॉमिकमधली ही कहाणी ७ डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. 'द आर्चीज' ची चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. बॉलिवूडमधील इतर कलाकारांनी कमेंट करत स्टारकिड्सला शुभेच्छा दिल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी मात्र नेपोटिझम नेपोटिझम म्हणत सिनेमाच्या विरोधात कमेंट केल्या आहेत.

Web Title: Star kids movie The Archies Trailer released starring Suhana Khan Kushi Kapoor and Agastya Nanda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.