राजमौलींच्या ‘RRR’मधील अंगावर काटा आणणाऱ्या या एका सीनसाठी किती खर्च झाला माहितीये?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2022 02:27 PM2022-01-02T14:27:02+5:302022-01-02T14:28:12+5:30

RRR Movie : राजमौलीच्या ‘आरआरआर’ या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. डोळ्यांचं पारणं फिटेल असे अ‍ॅक्शन सीक्वेन्स, दमदार स्टारकास्ट, अंगावर काटा आणणारे स्पेशल इफेक्ट्स आणि राजमौलींचा टच असं सगळं म्हटल्यावर चर्चा तर होणारच.

SS Rajamouli spending Rs 75 lakh on this Tiger Scene in RRR | राजमौलींच्या ‘RRR’मधील अंगावर काटा आणणाऱ्या या एका सीनसाठी किती खर्च झाला माहितीये?

राजमौलींच्या ‘RRR’मधील अंगावर काटा आणणाऱ्या या एका सीनसाठी किती खर्च झाला माहितीये?

googlenewsNext

‘बाहुबली’ या अभूतपूर्व चित्रपटानंतर दिग्दर्शक एस. एस. राजमौली (SS Rajamouli) यांचा ‘आरआरआर’ (RRR Movie )हा सिनेमा प्रदर्शित होतोय आणि या सिनेमाकडे भारताचं नव्हे तर साऱ्या जगाचं लक्ष लागलं आहे. येत्या 7 जानेवारीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार होता. पण कोरोना संक्रमणाची वाढता वेग पाहून पुन्हा एकदा या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. तूर्तास राजमौलीच्या या सिनेमाची जोरदार चर्चा आहे. डोळ्यांचं पारणं फिटेल असे अ‍ॅक्शन सीक्वेन्स, दमदार स्टारकास्ट, अंगावर काटा आणणारे स्पेशल इफेक्ट्स आणि राजमौलींचा टच असं सगळं म्हटल्यावर चर्चा तर होणारच.

रामचरण  (Ram charan) आणि ज्युनिअर एनटीआर  (Jr NTR) या दोन पॉवरफुल स्टार्सची जुगलबंदी, सोबतीला अजय देवगण आणि आलिया भट सारखे दमदार स्टार्सचा अभिनय या चित्रपटात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. सिनेमातल्या प्रत्येक सीनवर राजमौली आणि कलाकारांनी प्रचंड मेहनत घेतलीये. त्यातल्या त्यात एक सीन सर्वाधिक खास आहे. होय, हा सीन म्हणजे वाघासोबतचा सीन.

ज्युनिअर एनटीआरने या चित्रपटात वाघासोबत फाईट करताना दिसणार आहे. हा सीन इतका खराखुरा वाटातो की, खरोखरच्या वाघासोबत तो शूट केला आहे, असं क्षणभर वाटतं. पण प्रत्यक्षात तो व्हीएफएक्सच्या माध्यमातून शूट करण्यात आला आहे. या सीनवर राजमौलींनी किती पैसे माहितीये? तर या एका सीनवर 75 लाखांचा खर्च झाला. एका सीनवर 75 लाख रूपये खर्च झाले असतील तर या सिनेमाच्या एकूण बजेटबद्दल आपण विचार न केलेलाच बरा.

चर्चा खरी मानाल तर, रामचरण व ज्युनिअर एनटीआर यांच्या एका एन्ट्री सीनवर तब्बल 25 कोटींचा खर्च झाला आहे. या चित्रपटाचा एकूण बजेट 401 कोटी असल्याचं म्हटलं जातंय. राजमौलींचा सिनेमा म्हटल्यावर हा पैसा वसूल होणार, हे नक्कीच आहे.   हा सिनेमा बाहुबलीची जागा घेऊ शकणार की नाही, हेही लवकरच कळणार आहे.

Web Title: SS Rajamouli spending Rs 75 lakh on this Tiger Scene in RRR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.