​ श्रीदेवीची लेक जान्हवी कपूर रणबीर कपूरवर ‘फिदा’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2017 15:38 IST2017-05-26T10:08:56+5:302017-05-26T15:38:56+5:30

बॉलिवूड सेलिब्रिटी एका छताखाली येणे म्हणजे, गॉसिप्सचा पूर येणे. विशेषत: ती करण जोहरची पार्टी असेल आणि या पार्टीला बॉलिवूडचे ...

Sridevi's Lake Janhavi Kapoor is 'Fida' on Ranbir Kapoor !! | ​ श्रीदेवीची लेक जान्हवी कपूर रणबीर कपूरवर ‘फिदा’!!

​ श्रीदेवीची लेक जान्हवी कपूर रणबीर कपूरवर ‘फिदा’!!

लिवूड सेलिब्रिटी एका छताखाली येणे म्हणजे, गॉसिप्सचा पूर येणे. विशेषत: ती करण जोहरची पार्टी असेल आणि या पार्टीला बॉलिवूडचे सगळे ए-लिस्टेड सेलिब्रिटी हजर असतील तर विचारूच नका. काल रात्री करण जोहरच्या बर्थची जोरदार पार्टी रंगली. मग काय? या पार्टीतील काही गॉसिप्स तुम्हाला ऐकवलेच पाहिजेत ना?



या पार्टीत श्रीदेवीची हॉट अ‍ॅण्ड ब्युटिफुल लेक जान्हवी कपूरही पोहोचली होती, हे तर तुम्हाला ठाऊक आहेच. तर बातमी जान्हवीशीच संबंधित आहे. करणची पार्टी एन्जॉय करण्यासोबत जान्हवी याठिकाणी काय करत होती माहितीय?  तर पूर्णवेळ रणबीर कपूरच्या अवती-भवती घिरट्या घालत होती. रणबीर बॉलिवूडचा स्टार आहे. याऊलट जान्हवी अद्याप बॉलिवूड एन्ट्रीची प्रतीक्षा करतेय. अशावेळी रणबीरशी फ्रेन्डली होण्यासाठी पार्टीपेक्षा अधिक दुसरे योग्य ठिकाण कुठले असेल बरे. रणबीर आदित्य राय कपूर आणि अनुष्का शर्मासोबत गप्पा ठोकत असताना जान्हवी रणबीरच्या क्लोज येण्याचा प्रयत्न करत होती. आता रणबीरच का? या प्रश्नाचे उत्तर तर आम्हाला ठाऊक नाही. येत्या काळात जान्हवीकडूनच या प्रश्नाचे उत्तर मिळेल अशी अपेक्षा करूयात.
करणच्या पार्टीत रणबीर हा जान्हवीचा सावत्र भाऊ अर्जुन कपूरसोबत पोहोचला होता. रणबीर आणि अर्जुन दोघेही एकाच गाडीतून पार्टीला आले होते. रणबीरची एक्स-गर्लफ्रेन्ड कॅटरिना कैफ ही सुद्धा या पार्टीला पोहोचली होती. यावेळी रणबीर, कॅटरिना, अर्जुन, आदित्य राय कपूर असे सगळेच मस्ती करताना दिसले. पण या मस्तीत ब्युटिफुल जान्हवी केवळ एकाच व्यक्तिला फॉलो करत होती. ती व्यक्ती म्हणजे रणबीर. आहे ना इंटरेस्टिंग. तुम्हाला काय वाटते, ते आम्हाला जरूर कळवा.

Web Title: Sridevi's Lake Janhavi Kapoor is 'Fida' on Ranbir Kapoor !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.