श्रीदेवी यांच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार, रजनीकांत मुंबईत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2018 06:37 AM2018-02-26T06:37:13+5:302018-02-26T12:07:13+5:30

श्रीदेवी यांनी शनिवारी रात्री जगाचा निरोप घेतला. मोहित मारवाहच्या लग्नसमारांभासाठी संपूर्ण कपूर खानदान दुबईमध्ये सेलिब्रेशन करीत होते. तर दुसरीकडे ...

Sridevi's funeral will be done today, in Rajinikanth, Mumbai | श्रीदेवी यांच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार, रजनीकांत मुंबईत दाखल

श्रीदेवी यांच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार, रजनीकांत मुंबईत दाखल

googlenewsNext
रीदेवी यांनी शनिवारी रात्री जगाचा निरोप घेतला. मोहित मारवाहच्या लग्नसमारांभासाठी संपूर्ण कपूर खानदान दुबईमध्ये सेलिब्रेशन करीत होते. तर दुसरीकडे जान्हवी कपूर तिच्या आगामी ‘धडक’ या चित्रपटाची शूटिंग करीत होती. शूटिंगमुळेच ती या समारंभात सहभागी होऊ शकली नाही. जान्हवीला भेटण्यासाठी अनिल कपूर यांच्या घरी सेलिब्रेटीची रिघ लागली आहे.. श्रीदेवी यांच्या अखेरचे दर्शन घेण्यासाठी अनेकांनी मुंबईचा रस्ता धरला आहे. यात अभिनेते रजनीकांत यांचा ही समावेश आहे. सोमवारी पहाटेच ते मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. थोड्यावेळा पूर्वी ते मुंबईत विमानतळावर दाखलदेखील झाले आहेत. रजनीकांत आणि श्रीदेवी यांच्या मैत्रीविषयी कलाविश्वात बरीच चर्चा होती. आज दुपार पर्यंत त्यांचे पार्थिव मुंबईत आणण्यात येणार आहे.  

ALSO READ :  श्रीदेवींचे पार्थिव दुपारपर्यंत मुंबईत आणणार! चाहत्यांची घालमेल वाढली!!

बॉलिवूड प्रमाणे श्रीदेवी साऊथ चित्रपट सृष्टीच्याही जवळ होत्या. त्यांनी वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी तमिळ चित्रपटात काम केले. 1967 साली त्यांचा एका मल्याळम चित्रपटातील भूमिकेसाठी केरळ सरकारने सर्वोत्कृष्ट बाल कलाकार म्हणून गौरव केला होता. 1978 साली सोलावा सावन या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांत काम केले आहे. बॉलिवूडमधील सदमा, नागिन, निगाहें, मिस्टर इंडिया, चालबाज, लम्हे, खुदा गवाह, जुदाई अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारल्या. श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये अभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्काराने स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला आहे. त्यांनी सदमा, मिस्टर इंडिया, नागिन, लम्हें, इंग्लिश विंग्लिश, मॉम यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये आपली भूमिका साकारुन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. मॉम हा चित्रपटात त्यांचा शेवटचा ठरला. मॉम या चित्रपटातील तिने साकारलेली आई प्रेक्षकांना चांगलीच भावली. हा चित्रपट तिच्या कारकिर्दीतील 300 वा चित्रपट ठरला आणि शेवटचा ठरला.   

Web Title: Sridevi's funeral will be done today, in Rajinikanth, Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.