​लेकीच्या बॉलिवूड डेब्यूबद्दल अखेर बोलली श्रीदेवी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2017 11:30 IST2017-06-04T06:00:53+5:302017-06-04T11:30:53+5:30

जान्हवी सोबत असल्यावर श्रीदेवीला जान्हवीच्या बॉलिवूड डेब्यूबद्दल विचारले जाणार नाही, असे शक्यच नाही. जान्हवीच्या बॉलिवूड डेब्यूबद्दल मग श्रीदेवीला हटकून प्रश्न विचारला गेला. यावर श्रीदेवीने काय उत्तर दिले माहितीय?

Sridevi talks about Leki's Bollywood debut! | ​लेकीच्या बॉलिवूड डेब्यूबद्दल अखेर बोलली श्रीदेवी!

​लेकीच्या बॉलिवूड डेब्यूबद्दल अखेर बोलली श्रीदेवी!

ल बॉलिवूडची ‘हवा हवाई’ श्रीदेवी हिने ‘मॉम’चा ट्रेलर लॉन्च केला. यावेळी श्रीदेवी आपल्या संपूर्ण कुटुंबासह पोहोचली होती. पती बोनी कपूर, दोन्ही मुली जान्हवी व खुशी असे सगळे श्रीदेवीसोबत होते. ‘मॉम’बद्दल श्रीदेवी कमालीची उत्सूक दिसली. माझा कुठलाही चित्रपट असो मला तो माझा पहिलाच चित्रपट आहे, असेच वाटते. पहिल्या चित्रपटावेळी जितके उत्सूक होते, अगदी तितकीच उत्सूक मी आजही आहे. जणू मी एक न्यूकमर आहे. मला अद्याप खूप काही शिकायचे आहे. या चित्रपटात मी अनेक नव्या कलाकारांसोबत काम केलेय. अक्षय खन्ना, नवाजुद्दीन सिद्दीकी, असे अनेकजण आहेत. नवाजचे म्हणाल तर तो एक गिफ्टेड अ‍ॅक्टर आहे. त्याला पडद्यावर पाहणे एक अद्भूत अनुभव असतो. मी त्याची खूप मोठी फॅन आहे. अक्षय खन्ना हा सुद्धा गुणी अभिनेता आहे, असे श्रीदेवी म्हणाली. तुम्हाला हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल की, ‘मॉम’ हा श्रीदेवीचा ३०० वा चित्रपट आहे.



श्रीदेवीचा हा उत्साह खरोखरीच बघण्यासारखा होता. यावेळी श्रीदेवीसोबत जान्हवीही होती. आता जान्हवी सोबत असल्यावर श्रीदेवीला जान्हवीच्या बॉलिवूड डेब्यूबद्दल विचारले जाणार नाही, असे शक्यच नाही. जान्हवीच्या बॉलिवूड डेब्यूबद्दल मग श्रीदेवीला हटकून प्रश्न विचारला गेला. यावर श्रीदेवीने काय उत्तर दिले माहितीय? तिने हा प्रश्न शिताफीने टाळला. आज आपण जान्हवीच्या ‘मॉम’बद्दल बोलू यात. जान्हवीबद्दल आपण नंतर कधी बोलू, असे ती म्हणाली. 



आता श्रीदेवी जान्हवीच्या बॉलिवूड डेब्यूबद्दल बोलायला तयार नाही तर आम्हीच तुम्हाला सांगितले पाहिजे. होय, जान्हवी करण जोहरच्या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करण्यासाठी एकदम तयार आहे. कदाचित ‘सैराट’च्या हिंदी रिमेकमध्ये जान्हवी दिसणार असल्याचे वृत्त आहे.

Web Title: Sridevi talks about Leki's Bollywood debut!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.