​‘बाहुबली2’च्या दिग्दर्शकाला श्रीदेवीने असे घेतले फैलावर! वाचा काय आहे प्रकरण!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2017 14:49 IST2017-06-27T09:19:44+5:302017-06-27T14:49:44+5:30

‘बाहुबली2’ ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर श्रीदेवीला जाईल तिथे एकच प्रश्न विचारला जातो आहे. तो म्हणजे, तिने ‘बाहुबली2’मधील शिवगामीच्या भूमिकेला नकार का ...

Sridevi has taken the lead of 'Bahubali2'! Read what the episode !! | ​‘बाहुबली2’च्या दिग्दर्शकाला श्रीदेवीने असे घेतले फैलावर! वाचा काय आहे प्रकरण!!

​‘बाहुबली2’च्या दिग्दर्शकाला श्रीदेवीने असे घेतले फैलावर! वाचा काय आहे प्रकरण!!

ाहुबली2’ ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर श्रीदेवीला जाईल तिथे एकच प्रश्न विचारला जातो आहे. तो म्हणजे, तिने ‘बाहुबली2’मधील शिवगामीच्या भूमिकेला नकार का दिला? शिवगामीची भूमिका सर्वप्रथम श्रीदेवीला आॅफर झाली होती. पण श्रीदेवीने ही भूमिका करण्यास नकार दिला. श्रीदेवीच्या नकारानंतर ही भूमिका राम्या कृष्णन हिला आॅफर केली गेली. राम्याने या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आणि तिची जोरदार प्रशंसा झाली आणि इकडे श्रीदेवी एका बड्या चित्रपटाचा भाग बनता बनता राहिली.


अलीकडे श्रीदेवीला पुन्हा एकदा याच प्रश्नाला सामोरे जावे लागले. शिवगामीची भूमिका का नाकारलीस, हा प्रश्न तिला विचारण्यात आला. पण यावेळी श्रीदेवीचा पारा चांगलाच चढला. मग काय ‘बाहुबली2’चे दिग्दर्शक एस.एस. राजमौली यांच्यावर तिने आपली सगळी भडास काढली. ‘बाहुबली2’च्या निमित्ताने माझ्याबद्द्ल अनेक अफवा पेरल्या गेल्यात. या भूमिकेसाठी १० कोटी, एका हॉटेलचा संपूर्ण फ्लोर व १० लोकांच्या तिकिटाची मागणी केली, असे काय काय पेरले गेले. आधी मी याकडे दुर्लक्ष केले. पण राजमौली यांची मुलाखत बघून मला धक्का बसला. राजमौली एक प्रतिभावान दिग्दर्शक आहेत. मला त्यांच्यासोबत काम करायला आवडलेच असते. पण या सर्व प्रकारानंतर मी कमालीची दु:खी आहे. मी कुठल्याही मागण्या केल्या नाहीत. मी बॉलिवूडमध्ये ५० वर्षांपासून आहे. ३०० पेक्षा अििधक चित्रपट मी केले आहेत. मी अशी मागणी करू शकते, यावर कुणाचाच विश्वास नाही. या सगळ्या अफवा आहेत. माझ्या बाबतीत अशा अफवा उठणे खरोखरीच दु:खद आहे, असे श्रीदेवी म्हणाली. लवकरच श्रीदेवीचा ‘मॉम’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Web Title: Sridevi has taken the lead of 'Bahubali2'! Read what the episode !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.