'खुदा गवाह' सिनेमात श्रीदेवीला करायचं नव्हतं काम, मग 'या' एका अटीवर दिला होकार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 05:17 PM2024-02-01T17:17:41+5:302024-02-01T17:18:08+5:30

Sridevi : १९९२ साली रिलीज झालेल्या खुदा गवाह चित्रपटात अमिताभ बच्चन आणि श्रीदेवी यांच्या व्यतिरिक्त नागार्जुन, शिल्पा शिरोडकर, डॅनी आणि किरण कुमार मुख्य भूमिकेत होते.

Sridevi did not want to work in the movie 'Khuda Gawah', then she agreed on one condition | 'खुदा गवाह' सिनेमात श्रीदेवीला करायचं नव्हतं काम, मग 'या' एका अटीवर दिला होकार

'खुदा गवाह' सिनेमात श्रीदेवीला करायचं नव्हतं काम, मग 'या' एका अटीवर दिला होकार

नव्वदच्या दशकात प्रत्येक कलाकाराला एकदा तरी बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबत काम करायचे होते. नवोदीत कलाकारांचे म्हणणे होते की, त्यांच्यासोबत काम केल्यानंतर करिअरचा ग्राफ वाढेल. मात्र दुसरीकडे खुदा गवाह (Khuda Gawah) सिनेमात अमिताभ बच्चन यांना श्रीदेवी(Sridevi)सोबत काम करायचे होते. मात्र त्यासाठी श्रीदेवी तयार नव्हती. तिला सिनेमात सहकलाकाराची भूमिका करायची नव्हती. तिला स्त्री केंद्रीत सिनेमात काम करायचे होते. अशात बिग बींनी तिला या चित्रपटात काम करावे म्हणून मनवण्यासाठी तिच्यावर फुलांचा वर्षाव केला होता. श्रीदेवीःद इंटरनल स्क्रीन गॉडेस पुस्तकात दिवंगत कोरिओग्राफर सरोज खानने हा किस्सा सांगितला होता.

सरोज खानने सांगितले होते की, आम्ही एका गाण्याचं शूटिंग करत होतो. तेव्हा एक ट्रॅक आले आणि तिच्यासमोर श्रीदेवीला आणून उभे केले. मग तिच्यावर गुलाबांच्या फुलांचा वर्षाव केला. हा खूप सुंदर सीन होता. ही गोष्ट श्रीदेवीला भावली पण तिच्यानुसार, ही गोष्ट पण तिच्या हिशोबानं कमीच होती. मग तिने चित्रपटात काम करण्यासाठी एक अट ठेवली. 

श्रीदेवीने ठेवली होती ही अट

श्रीदेवीने या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत डबल रोलमध्ये दिसली पाहिजे, अशी अट ठेवली. दिग्दर्शक मनोज देसाई आणि मुकुल आनंद यांनी अभिनेत्रीच्या या अटीपुढे हार मानली आणि तिची या चित्रपटासाठी निवड केली. हा चित्रपट बिग बी आणि श्रीदेवी यांच्या दोघांच्या करिअरमधला सर्वात हिट चित्रपट ठरला. चित्रपटात श्रीदेवीने बेनजीर आणि मेहंदी नामक तरुणींची भूमिका केली होती. खुदा गवाहच्या आधी रमेश सिप्पी यांचा चित्रपट राम की सीता, श्याम की गीतामध्येही श्रीदेवी आणि अमिताभ बच्चन यांना साइन केले होते. यातही दोघांचा डबल रोल होता.

अफगाणिस्तानमध्ये पार पडलं होतं शूटिंग
खुदा गवाह चित्रपटाचे शूटिंग अफगाणिस्तानमधील काही ठिकाणी करण्यात आले होते. त्यावेळी तिथे युद्ध परिस्थिती होती. चहुबाजूला गोळीबार होत होता आणि मिसाइलचा वापरदेखील सामान्य होता. सोवियतने अफगाणिस्तानवरील कब्जा काढून देशाची जबाबदारी नजीबुल्लाह यांना दिली होती. जे नंतर राष्ट्रपती बनले. ते भारतीय चित्रपटाचे खूप मोठे चाहते होते. त्यामुळे त्यांनी अमिताभ बच्चन आणि श्रीदेवीच्या चित्रपटाच्या शूटिंगला परवानगी दिली होती. 

अफगाणिस्तानमध्येही ठरला होता सुपरहिट
१९९२ साली रिलीज झालेल्या खुदा गवाह चित्रपटात अमिताभ बच्चन आणि श्रीदेवी यांच्या व्यतिरिक्त नागार्जुन, शिल्पा शिरोडकर, डॅनी आणि किरण कुमार मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने जगभरात १७.९ कोटींची कमाई केली होती.
 

Web Title: Sridevi did not want to work in the movie 'Khuda Gawah', then she agreed on one condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.