​आमिर खानच्या चित्रपटाचे प्रमोशन करतेय एक खास व्यक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2016 12:31 IST2016-12-15T12:31:52+5:302016-12-15T12:31:52+5:30

आमिर खानच्या दंगल या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन सुरू आहे. दंगल या चित्रपटासाठी आमिर खानने कित्येक किलो वजन वाढवले ...

A special person promoting Aamir Khan's film | ​आमिर खानच्या चित्रपटाचे प्रमोशन करतेय एक खास व्यक्ती

​आमिर खानच्या चित्रपटाचे प्रमोशन करतेय एक खास व्यक्ती

िर खानच्या दंगल या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन सुरू आहे. दंगल या चित्रपटासाठी आमिर खानने कित्येक किलो वजन वाढवले आहे. तसेच या भूमिकेवर त्याने खूप मेहनत घेतली आहे. तो गेली कित्येक वर्षँ या चित्रपटावर काम करत आहे.  आमिरचे चित्रपट म्हटले की, त्यात काहीतरी खास असणार याची चांगलीच कल्पना प्रेक्षकांना असते. त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.
चित्रपट कितीही चांगला असला तरी तो लोकांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचा असतो आणि त्यासाठी प्रमोशन करणे हे खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे सध्या या चित्रपटाचे प्रमोशन करण्याची एकही संधी आमिर खान सोडत नाहीये. आमिरच्या या चित्रपटात त्याला दोन मुली असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्याच्या मुलींच्या भूमिकेत फतिमा साना शेख आणि बबिता कुमारी या अभिनेत्री आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमिरच्या या दोन मुली सध्या सतत त्याच्यासोबत दिसत आहेत. तसेच काही वेळा या चित्रपटातील त्याच्या मुली आणि आमिरची खऱ्या आयुष्यातील इरा ही मुलगी आपल्याला एकत्र वेळ घालवताना दिसत आहेत. 
आमिरच्या चित्रपटाचे प्रमोशन सगळ्यांसोबतच त्याची मुलगी इरादेखील करत आहे. नुकतेच तिने घातलेल्या एका टी-शर्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या टी-शर्टवर दंगल या चित्रपटातील एका गाण्यातील काही ओळी लिहिलेल्या होत्या. टी-शर्टवरील बापू सेहत के लिये तू तो हानिकारक है असे लिहिले होते. या टी-शर्टद्वारे तिने वडिलांच्या चित्रपटाचे प्रमोशन केले हे वेगळे सांगण्याची गरजच नाही. 

Web Title: A special person promoting Aamir Khan's film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.