अक्षय पत्नी व मुलांना देणार ‘हे’ स्पेशल दिवाळी गिफ्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 13:31 IST2016-10-17T13:31:57+5:302016-10-17T13:31:57+5:30

अक्षय कुमार कितीही बिझी असला तरी कुटुंबासाठी आवर्जून वेळ काढतो. पत्नी ट्विंकल आणि मुले आरव व नितारा यांच्यासाठी आनंदासाठी अक्षय ...

Special Diwali gift to Akshay Wife and children to give! | अक्षय पत्नी व मुलांना देणार ‘हे’ स्पेशल दिवाळी गिफ्ट!

अक्षय पत्नी व मुलांना देणार ‘हे’ स्पेशल दिवाळी गिफ्ट!

्षय कुमार कितीही बिझी असला तरी कुटुंबासाठी आवर्जून वेळ काढतो. पत्नी ट्विंकल आणि मुले आरव व नितारा यांच्यासाठी आनंदासाठी अक्षय सतत धडपडत असतो. आता हेच पाहा ना! दिवाळी तोंडावर आहे आणि दिवाळीनिमित्त अक्षय कुटुंबीयांना देणार असलेले गिफ्टही तयार आहे. होय, यंदाच्या दिवाळीत अक्षय ट्विंकल, आरव व नितारा यांना स्पेशल दिवाळी गिफ्ट देणार आहे. ते कोणते? तर केपटाऊन ट्रिप. होय, दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन येथे दिवाळी सेलिब्रेट करण्याचा प्लॅन अक्षयने आखला आहे. गतवर्षी त्याने जुहू येथील त्याच्या बंगल्यावर जवळच्या मित्रांसोबत दिवाळी साजरी केली होती. यावर्षी मात्र काही तरी ‘थरारक’ करण्याचा त्याचा विचार आहे. केप टाऊनमध्ये अक्षयने अनेक चित्रपटांचे शूटींग केले आहे. हे शहर त्याला मनापासून आवडते. केपटाऊन त्याला त्याचे दुसरे घर वाटते. आता असे असताना सेलिब्रेशन तो बनता ही है ना!!

  

Web Title: Special Diwali gift to Akshay Wife and children to give!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.