साउथचा ‘हा’ सुपरस्टार आहे राजकुमार हिराणींचा जबरा फॅन; बॉलिवूडमध्ये करू इच्छितो कमबॅक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2018 17:47 IST2018-05-25T12:17:27+5:302018-05-25T17:47:34+5:30

साउथ इंडस्ट्रीत आपल्या अभिनयाने वेगळे स्थान निर्माण करणारा हा सुपरस्टार आता पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्याच्या तयारीत आहे.

South's 'Ha' superstar is a fan of 'Hindu Honeymoon'; Kickback to Bollywood! | साउथचा ‘हा’ सुपरस्टार आहे राजकुमार हिराणींचा जबरा फॅन; बॉलिवूडमध्ये करू इच्छितो कमबॅक!

साउथचा ‘हा’ सुपरस्टार आहे राजकुमार हिराणींचा जबरा फॅन; बॉलिवूडमध्ये करू इच्छितो कमबॅक!

लगू अभिनेता तथा निर्माता राम चरणच्या मते, २०१३ मध्ये आलेल्या ‘जंजीर’नंतर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यासाठी मी तयार आहे. तसेच मला दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे. राम चरणला जेव्हा विचारण्यात आले की, बॉलिवूडमध्ये तुझा आवडता दिग्दर्शक आहे काय?, तर यावर उत्तर देताना त्याने, ‘मी राजकुमार हिरानी सरांचा खूप मोठा चाहता आहे. मला त्यांच्यासोबत काम करायला आवडेल.’ त्याने म्हटले की, ‘ते त्या दिग्दर्शकांपैकी आहेत जे त्यांच्या चित्रपटाला कला आणि व्यावसायिकतेला एक स्तरावर संतुलित ठेवतात. त्यामुळेच त्यांच्यासोबत काम करण्याची माझी इच्छा आहे. 

पुढे बोलताना राम चरणने म्हटले की, ‘मी विशाल भारद्वाज यांचेही काही चित्रपट बघितले आहेत. त्यांनी काही उत्कृष्ट चित्रपटांची निर्मिती केली आहे.’ रामने म्हटले की, जर मला एखादा चांगला बॉलिवूड प्रोजेक्ट मिळाला तर त्यात काम करायला मला नक्की आवडेल. मात्र दिग्दर्शक, कथा आणि प्रोडक्शन यासर्व गोष्टी मनासारख्या मिळायला हव्यात. दरम्यान, ‘मगधीरा’ या चित्रपटानंतर राम चरणने इंडस्ट्रीत स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. हा त्याच्या करिअरमधील दुसरा असा चित्रपट ठरला, ज्यामध्ये त्याचा दमदार अभिनय बघावयास मिळाला. राम चरणने त्याचे वडील सुपरस्टार चिरंजिवीचा १५०वा चित्रपटही प्रोड्यूस केला आहे. ज्यामध्ये त्याचा काका पवन कल्याणही बघावयास मिळाला. 

A post shared by Ram Charan

Web Title: South's 'Ha' superstar is a fan of 'Hindu Honeymoon'; Kickback to Bollywood!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.