​साऊथची ‘सनसनी’ तापसी पन्नू बॉलिवूडमध्ये येण्याआधी करायची हे काम!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2017 06:23 AM2017-08-01T06:23:27+5:302017-08-01T11:59:23+5:30

अभिनेत्री तापसी पन्नू हिचा आज (१ आॅगस्ट) वाढदिवस. एकेकाळी साऊथ चित्रपटांची ‘सनसनी’ असलेली तापसी आज बॉलिवूडची ‘धडकन’ बनली आहे. ...

Southeastern 'Sassanee' Tapasi Pannu is the work to do before coming to Bollywood! | ​साऊथची ‘सनसनी’ तापसी पन्नू बॉलिवूडमध्ये येण्याआधी करायची हे काम!

​साऊथची ‘सनसनी’ तापसी पन्नू बॉलिवूडमध्ये येण्याआधी करायची हे काम!

googlenewsNext
ong>अभिनेत्री तापसी पन्नू हिचा आज (१ आॅगस्ट) वाढदिवस. एकेकाळी साऊथ चित्रपटांची ‘सनसनी’ असलेली तापसी आज बॉलिवूडची ‘धडकन’ बनली आहे. जाणून घेऊ या, तापसीबद्दल काही माहित नसलेल्या गोष्टी....



तापसीचा जन्म १ आॅगस्ट १९८८ रोजी दिल्लीत झाला. एका शिख कुटुंबात जन्मलेली तापसी शाळेत असताना अतिशय उनाड होती. मुलींसोबत मुलांसोबत भांडणे काढणे, धम्माल मस्ती करणे असे सगळे ती करायची. लहानपणी तापसी खेळांमध्ये अग्रेसर असायची. शाळेत असताना तिला विविध स्पोर्ट्समध्ये सहभागी व्हायला आवडायचे. ८ वर्षांची असताना तापसीने डान्स शिकायला सुरुवात केली. कॉलेजच्या दिवसांत मात्र तिने डान्स गंभीरतेने घेण्यास सुरुवात केली. त्याचाच परिपाक म्हणजे, तापसी आज एक उत्कृष्ट डान्सर आहे.



चित्रपट आणि मॉडेलिंगच्या जगात यशाच्या शिखरावर पोहोचलेली तापसी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. काही काळ नोकरी केल्यानंतर अचानक तापसी मॉडेलिंगकडे वळली. फुल टाईम मॉडेल बनणे, हेच तिचे स्वप्न होते. पण नंतर ती अपेक्षेनुसार अभिनयक्षेत्रात आली.



हिंदी व इंग्रजीसह तापसीला अर्धा डझन भाषा येतात. तापसीला तिचे मित्र ‘मॅगी’ या नावाने बोलवतात. तिच्या कुरळ्या केसांमुळे तिला हे नाव मिळाले.



२०१० मध्ये ‘झूमंडी नादम’ या तेलगू चित्रपटाद्वारे तापसीने अ‍ॅक्टिंग डेब्यू केला. यानंतर तिचा ‘आदुकलम’ हा दुसरा तामिळ चित्रपट आला. यात ती धनुषसोबत दिसली. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आणि तापसी नावारूपास आली. या चित्रपटाने सहा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकले. २०१३ मध्ये ‘चश्मेबद्दूर’ या चित्रपटाद्वारे तापसीने बॉलिवूड डेब्यू केले.



‘पिंक’ या गतवर्षी आलेल्या चित्रपटाने तापसीला बॉलिवूडमध्ये नवी ओळख दिली. यात तापसीने साकारलेली मीनल अरोराची भूमिका प्रचंड गाजली. यानंतर तापसीकडे बॉलिवूड आॅफर्सची रांग लागली.



साऊथच्या चित्रपटांनी तापसीला प्रचंड लोकप्रीयता दिली. २०११ मध्ये तापसीच्या एका पाठोपाठ एक असे सात चित्रपट आले होते, यावरून तिच्या लोकप्रीयतेचा अंदाज लावता येऊ शकते. बॉलिवूड चित्रपटांबद्दल बोलायचे तर गतवर्षी ‘रनिंग शादी डॉट कॉम’,‘द गाजी अटॅक’,‘नाम शबाना’ अशा तिन चित्रपटांत दिसली. सध्या ती ‘जुडवा2’ या चित्रपटात व्यस्त आहे.


 

Web Title: Southeastern 'Sassanee' Tapasi Pannu is the work to do before coming to Bollywood!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.