Suraj Kumar : भयंकर! अभिनेता सूरज कुमारचा भीषण अपघात; गमवावा लागला उजवा पाय, जाणून घ्या, प्रकृती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 03:04 PM2023-06-26T15:04:38+5:302023-06-26T15:23:05+5:30

Suraj Kumar : सूरज कुमार उर्फ ​​ध्रुवनचा शनिवारी म्हैसूर-गुंडलुपेट महामार्गावर भीषण अपघात झाला.

south actor Suraj Kumar injured in major road accident he lost his right leg | Suraj Kumar : भयंकर! अभिनेता सूरज कुमारचा भीषण अपघात; गमवावा लागला उजवा पाय, जाणून घ्या, प्रकृती

Suraj Kumar : भयंकर! अभिनेता सूरज कुमारचा भीषण अपघात; गमवावा लागला उजवा पाय, जाणून घ्या, प्रकृती

googlenewsNext

अभिनेता सूरज कुमार (Suraj Kumar) उर्फ ​​ध्रुवनचा शनिवारी म्हैसूर-गुंडलुपेट महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला आहे. अभिनेत्याला अत्यंत गंभीर दुखापत झाली असून त्याला म्हैसूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूरज कुमार हा डॉ. राजकुमार यांच्या पत्नी परवथम्मा यांचा पुतण्य़ा आहे. रिपोर्टनुसार, या अपघातात सूरजच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली होती, त्यामुळे डॉक्टरांना तो पाय कापावा लागला आहे. 

25 जूनच्या संध्याकाळी 24 वर्षीय सूरज कुमार म्हैसूरहून उटीला बाईकवर जात असताना ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना त्याचा तोल गेला. गुंडलुपेट तालुक्यातील हिरीकाती गेटजवळ दुपारी चार वाजताच्या सुमारास त्याला एका टिपर लॉरीने धडक दिली, त्यानंतर अभिनेत्याला म्हैसूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 

सूरज कुमार ज्याने चित्रपटात एन्ट्री करताना आपलं नाव बदलून ध्रुवन ठेवलं. सूरजच्या फिल्मी करिअरची सुरुवात 2019 मध्ये झाली, जेव्हा त्याने दिग्दर्शक रघु कोवीच्या चित्रपटातून पदार्पण केलं. मोठ्या धूमधडाक्यात त्याने कन्नड फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला. हा चित्रपट फारसा चालला नाही आणि ध्रुवनने यानंतर दुसरा चित्रपट केला, पण त्या चित्रपटाने देखील फारशी जादू केली नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: south actor Suraj Kumar injured in major road accident he lost his right leg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात