खरं की काय? 56 वर्षाच्या अभिनेत्याने स्वत:पेक्षा 33 वर्षानं लहान मुलीशी गुपचूप बांधली लग्नगाठ...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 05:58 PM2022-10-20T17:58:36+5:302022-10-20T18:01:31+5:30

एक सुप्रसिद्ध अभिनेता त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे....

south actor babloo prithiveeraj rumoured secretly marrying 23 year-old girl | खरं की काय? 56 वर्षाच्या अभिनेत्याने स्वत:पेक्षा 33 वर्षानं लहान मुलीशी गुपचूप बांधली लग्नगाठ...!!

खरं की काय? 56 वर्षाच्या अभिनेत्याने स्वत:पेक्षा 33 वर्षानं लहान मुलीशी गुपचूप बांधली लग्नगाठ...!!

googlenewsNext

56 वर्षाच्या अभिनेत्याने 33 वर्षानं लहान तरूणीशी गुपचू बांधली लग्नगाठ...! हेडिंग वाचून आर्श्चयाचा धक्का बसला ना? होय, साऊथचा लोकप्रिय अभिनेता बबलू पृथ्वीराज ( Babloo Prithiveeraj) दुसऱ्यांदा बोहल्यावर चढला आहे.   चर्चा खरी मानाल तर 56 वर्षाच्या बबलूने स्वत:पेक्षा 33 वर्षांनी लहान मलेशियन मुलीशी गुपचूप लग्न केलं आहे. या बातमीत किती तथ्य आहे, हे अद्याप कळलेलं नाही. कारण अभिनेत्यानं अद्यापतरी याबद्दल कुठलाही खुलासा केलेला नाही. पण या बातमीची साऊथ इंडस्ट्रीत जोरदार चर्चा आहे.

बबलूने लग्न केल्याची बातमी वाऱ्याच्या वेगानं पसरली आणि मग त्याचीच चर्चा सुरू झाली. याचं कारण म्हणजे, बबलू आधीच विवाहित आहे. त्याच्या पत्नीचं नाव बीना आहे. 1994 साली बबलू व बीना यांचं लग्न झालं. दोघांना एक मुलगाही आहे. या मुलाचं वय 27 वर्ष आहे. मीडिया रिपोर्टनुसार, गेल्या काही वर्षांपासून बबलू व त्याची पत्नी बीना यांच्यात बिनसलं होतं. मुलगा ऑटिस्टिक असल्यानं दोघांमध्ये वाद सुरू झाले आणि हा वाद विकोपाला पोहोचला. वैवाहिक आयुष्यातील तणाव वाढल्यानं अखेर बबलू व बीना काही वर्षांआधी विभक्त झालेत. अशात आता बबलूने दुसरं लग्न केल्याचं कळतंय. अर्थात याबद्दल बबलूने कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही.


 
बबलू पृथ्वीराज हा तमिळ सिनेसृष्टीतील मोठं नाव आहे. अनेक तामिळ चित्रपटांत व मालिकेत त्याने काम केलं आहे. तामिळसोबतच तेलगू व कन्नड चित्रपटांतही त्याने विविध भूमिका साकारल्या आहेत. बबलू हा निगेटीव्ह भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे. बालकलाकार म्हणून करिअर सुरू करणाऱ्या बबलूने Naan Vazhavaippen  या चित्रपटातून करिअरला सुरूवात केली. 1980 साली त्याने कमबॅक केलं. खलनायकी भूमिकांनी त्याला विशेष ओळख दिली.  आत्तापर्यंत त्याने 100 हून अधिक साऊथ सिनेमांत काम केलं आहे.
बबलू पृथ्वीराज हा त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्याची कल्पना येईल. इन्स्टा अकाऊंटवर त्याचे अनेक वर्कआऊट व्हिडिओ, फोटो पाहायला मिळतात.  

Web Title: south actor babloo prithiveeraj rumoured secretly marrying 23 year-old girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.