Sonnalli Seygall Wedding: प्यार का पंचनामा फेम सोनाली सहगलने का केलं साध्या पद्धतीनं लग्न?, अभिनेत्रीने स्वत: सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 16:36 IST2023-06-08T15:27:39+5:302023-06-08T16:36:14+5:30

अभिनेत्रीनं आपलं लग्न खासगी का ठेवलं याबाबत खुलासा केला आहे.

Sonnalli seygall wedding with ashesh sajnani actress said this is a private moment | Sonnalli Seygall Wedding: प्यार का पंचनामा फेम सोनाली सहगलने का केलं साध्या पद्धतीनं लग्न?, अभिनेत्रीने स्वत: सांगितलं कारण

Sonnalli Seygall Wedding: प्यार का पंचनामा फेम सोनाली सहगलने का केलं साध्या पद्धतीनं लग्न?, अभिनेत्रीने स्वत: सांगितलं कारण

सोनाली सहगलने ७ जूनला आपला लॉन्ग टाईम बॉयफ्रेंड आशिष सजनानी सोबत लग्नगाठ बांधली. अभिनेत्रीने आपलं लग्न अत्यंत खासगी ठेवलं होते. यात लग्नात अभिनेता कार्तिक आर्यन आणि सनी सिंग सामील झाले होते. सोनालीने लग्नात पिंक रंगाची साडी नेसली होते ज्यात ती खूपच सुंदर दिसत होती. यादरम्यान अभिनेत्रीनं आपलं लग्न खासगी का ठेवलं याबाबत खुलासा केला आहे. 

हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सोनाली म्हणाली, 'आशिष आणि मी जवळच्या लोकांना बोलवून लग्न करण्याचे निश्चित झाले होतं. आमच्यासाठी हा अत्यंत वैयक्तिक क्षण आहे. आमच्या दोघांच्या ही आईंना हेच हवे होते आणि आम्ही तिच्यासाठी हे करू शकलो याचा आम्हाला आनंद आहे. आमच्या आयुष्याचा हा नवा प्रवास एकत्र जगण्यासाठी आम्ही खरोखरच उत्साहित आहोत.'

सोनालीने आपल्या लग्नात जवळच्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला बोलवलं होतं. कार्तिकस सनीसह मंदिरा बेदी, सुमोना चक्रवर्ती, चाहत खन्ना, शमा सिकंदर, रोहन गंडोत्रा आणि करण वी ग्रोव्हरने सोनालीच्या लग्नात हजेरी लावली होती. 
 
सोनालीचा पती आशिष हा बिझनेसमन आहे, त्याची बरीच हॉटेल्स आहेत. बराच काळ दोघांनी एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. सोनाली गेल्या 12 वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. मात्र, त्याला आतापर्यंत अपेक्षेप्रमाणे यश मिळू शकलेले नाही. 2011 मध्ये त्याने प्यार का पंचनामा या चित्रपटातून पदार्पण केले. यानंतर ती वेडिंग पुलाव, प्यार का पंचनामा 2, जय मम्मी दी यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सोनाली लवकरच नूरानी चेहरा या चित्रपटात दिसणार आहे. यात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि नुपूर सेनन मुख्य भूमिकेत आहेत.


 

Web Title: Sonnalli seygall wedding with ashesh sajnani actress said this is a private moment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.