सोनमचा सवाल, भारतात ‘प्रेगनेंन्सी इंशोरन्स’ का मिळत नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2016 09:20 IST2016-10-20T22:35:34+5:302016-10-21T09:20:29+5:30
करिना कपूर आणि सोनम कपूर आगामी ‘वीरे दी वेंडिंग’मध्ये एकत्र दिसणार आहेत. मात्र करिनाचे गरोदर असल्याने तिने या चित्रपटाच्या ...

सोनमचा सवाल, भारतात ‘प्रेगनेंन्सी इंशोरन्स’ का मिळत नाही
सोनमची बहीण रिया कपूर निर्मिती करीत असलेल्या ‘वीरे दी वेडिंग’ हा महिला प्रधान चित्रपट आहे. या चित्रपटात सोनम कपूर, स्वरा भास्करसह करिना कपूरची महत्त्वाची भूमिका आहे. या चित्रपटाच्या सुुरुवातीपासूनच अडचणींचा सामना करावा लागला असल्याचे मत सोनमने व्यक्त केले. एका संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार तिने या चित्रपटाला होत असलेल्या उशीरावर आपला राग व्यक्त केला.
सोनम म्हणाली, सुरुवातीला आम्हाला चित्रपटाच्या फंडिंगसाठी प्रयत्न करावे लागले. एखादी महिला जर चित्रपटाची निर्मिती करीत असेल तर तिची आर्थिक अडचण करण्याचा प्रयत्न होतो. यातून आम्ही मार्ग काढत असतानाच करिना कपूरची प्रेंगनेंट झाली. आम्ही तिच्या प्रेंगनेंसी इंशोरन्ससाठी प्रयत्न केले मात्र तिला तो मिळाला नाही. यामुळे आमचा चित्रपट लांबणीवर पडला आहे. भारत एकमेव असा देश आहे जेथे गरोदर स्त्रियांसाठी ‘प्रेगनेंन्सी इन्शोरन्स’ दिला जात नाही, असेही सोनम म्हणाली.
काही दिवसांपूर्वी सोनम आपल्या भाऊ हर्षवर्धनला दिलेल्या सल्ल्यामुळे चर्चेत आली होती. आता प्रेगनेंसी इंशोरन्सच्या विषयावर आपले मत मांडून तिने चर्चा रंगविली आहे.