लेकाच्या जन्मानंतर चिंतेत होती सोनम कपूर, म्हणाली- "माझं ३२ किलो वजन वाढलं होतं आणि..."

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 11:53 AM2024-04-27T11:53:48+5:302024-04-27T11:55:08+5:30

लेकाच्या जन्मानंतर सोनम कपूरचं वाढलं होतं तब्बल ३२ किलो वजन, म्हणाली - "मी दीड वर्ष..."

sonam kapoor was in trauma after son vayu birth said i gained 32kg weight | लेकाच्या जन्मानंतर चिंतेत होती सोनम कपूर, म्हणाली- "माझं ३२ किलो वजन वाढलं होतं आणि..."

लेकाच्या जन्मानंतर चिंतेत होती सोनम कपूर, म्हणाली- "माझं ३२ किलो वजन वाढलं होतं आणि..."

सोनम कपूर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सोनमनेही अभिनयात करिअर करायचं ठरवलं. सावंरिया, नीरजा, पॅडमॅन, रांझना, वीरे दी वेडिंग यांसारख्या सिनेमांत काम केल्यानंतर प्रेग्नंन्सीमुळे सोनमच्या करिअरला ब्रेक लागला होता. पण, आता तिला पुन्हा कमबॅक करायचं आहे. सोनमने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या प्रेग्नंन्सीबद्दल भाष्य केलं आहे. 

२०२२ मध्ये सोनमने वायूला जन्म दिला. पण, लेकाच्या जन्मानंतर ती ट्रॉमामध्ये गेली होती. प्रेग्नंन्सीनंतर सोनमचं ३२ किलो वजन वाढलं होतं. त्यामुळे सोनम चिंतेत होती. सोनमने नुकतीच एका पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने प्रेग्नंन्सीनंतरच्या काळाबद्दल भाष्य केलं. ती म्हणाली, "माझं ३२ किलो वजन वाढलं होतं. खरं सांगायचं तर मी सुरुवातीपासूनच चिंतेत होते. तुम्ही मुलामध्ये इतकं गुंतून जाता की व्यायाम, स्वत:चं शरीर, योग्य आहार याकडे दुर्लक्ष करता. मला या गोष्टींकडे लक्ष द्यायला दीड वर्ष लागलं." 

"तुमच्या आयुष्यात सगळं काही बदलून जातं. तुमचं स्वत:शी असलेलं नातं बदलतं. पतीबरोबरचं नातं बदलतं. तुमच्या शरीरात बदल होतात. मी नेहमी जशी आहे तसं स्वत:ला आणि शरीराला स्वीकारलं आहे. आणि मला असं वाटतं की याची गरज आहे," असंही पुढे सोनम म्हणाली. सोनमने प्रेग्नंन्सीनंतर वजन कमी केलं होतं. यासाठी तिला १६ महिन्यांचा कालावधी लागल्याचं अभिनेत्रीने सांगितलं होतं. सोनमचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहतेही थक्क झाले होते. 

Web Title: sonam kapoor was in trauma after son vayu birth said i gained 32kg weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.