'या' कारणामुळे सोनम कपूर-आनंद अहुजाचा लांबला हनीमून..

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2018 14:34 IST2018-05-05T08:38:23+5:302018-05-05T14:34:02+5:30

सोनम कपूर आणि लॉन्ग टाईम बॉयफ्रेंड आनंद अहुजा सोबत 8 मे रोजी लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. मात्र हे कपल ...

Sonam Kapoor-Anand Ahuja's Long Honeymoon For 'This' | 'या' कारणामुळे सोनम कपूर-आनंद अहुजाचा लांबला हनीमून..

'या' कारणामुळे सोनम कपूर-आनंद अहुजाचा लांबला हनीमून..

नम कपूर आणि लॉन्ग टाईम बॉयफ्रेंड आनंद अहुजा सोबत 8 मे रोजी लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. मात्र हे कपल लग्नानंतर लगेच हनीमूनला लग्नाला जाऊ शकत नाहीत. याचा मुख्य कारण सोनमचे बिझी शेड्यूल आणि प्रोफेशनल कमिटमेंट्स. 

मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, सोनम कपूरला 14 मे रोजी होणाऱ्या कॅन्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सामिल व्हायचे आहे. दरवर्षी प्रमाणे सोनम याही वर्षी आपल्या हटके अंदाजात रेडकार्पेटवर हजेरी लावणार आहे. यानंतर त्याला चित्रपटाचे प्रमोशन आणि शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे ऑक्टोबर किंवा  नोव्हेंबरमध्ये ती हनीमूनला जाणार आहे.लग्नानंतर सोनम मुंबईत आणि दिल्लीत ट्रव्हल करणार आहे. आधी मुंबईत लग्न होणार त्यानंतर दिल्लीत शाही रिसेप्शन होणार आहे. 

त्यानंतर सोनम 'वीरे दी वेडिंग'च्या प्रमोशनला लागणार आहे. 1 जूनला 'वीरे दी वेडिंग' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सोनमशिवाय करिना कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांच्या मुख्य भूमिका आहेत.‘वीरे दी वेडिंग’ चित्रपटाची कथा चार मुलींभवती फिरणारी आहे. करिनाच्या लग्नाला तिच्या तीन मैत्रिणी येतात आणि मग एकापाठोपाठ एक अशा धम्माल गोष्टी घडतात. महिला आणि त्यांच्या भावना या दाखवल्या जाणार आहेत. सोनम कपूरची बहीण रेहा कपूर या चित्रपटाची सहनिर्माती आहे. जुलैपासून सोनमला शैली चोप्रा दिग्दर्शित 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा'ची शूटिंगला सुरुवात करायची आहे. या चित्रपटातून शैली चोप्रा दिग्दर्शनात पदार्पण करते आहे. यात सोनमसह अनिल कपूर, जुही चावला आणि राजकुमार रावसुद्धा असणार आहेत. या चित्रपटाची शूटिंग पंजाबमध्ये होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच सोनम कपूर वडिल अनिल कपूर यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहेत. 

ALSO READ :  सुपरहिट होताच बांधली लगीनगाठ!!

Web Title: Sonam Kapoor-Anand Ahuja's Long Honeymoon For 'This'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.