सोनम दिसणार संजय दत्तच्या बायोपिकमध्ये ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2017 17:25 IST2017-05-12T11:55:39+5:302017-05-12T17:25:39+5:30

बॉलिवूडमधली फॅशन ऑयकॉन, राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री सोनम कपूर ही आपल्याला संजय दत्तच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. निर्माता राजकुमार हिरानी ...

Sonam appears in Sanjay Dutt's biopic? | सोनम दिसणार संजय दत्तच्या बायोपिकमध्ये ?

सोनम दिसणार संजय दत्तच्या बायोपिकमध्ये ?

लिवूडमधली फॅशन ऑयकॉन, राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री सोनम कपूर ही आपल्याला संजय दत्तच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. निर्माता राजकुमार हिरानी यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणार हे ऐकून सोनमाच्या आनंदाला सीमा उरली नव्हती. सोनम या चित्रपटात संजय दत्तच्या प्रेयसी भूमिकेत दिसणार असल्याची माहिती आहे. याचित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी करतायेत आणि रणबीर कपूर यात संजय दत्तची भूमिका साकारतोय. सोनमला तिच्या या चित्रपटातील भूमिका विषयी विचारण्यात आले तेव्हा तिने सांगण्यास नकार दिला. सोनम म्हणाली मी राजकुमार हिरानी यांची खूप मोठी फॅन आहे. मी आतापर्यंत त्यांचे सगळे चित्रपट पाहिले आहेत. मला जेव्हा त्याच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली तेव्हा मी खूप आनंदीत झाले होते. मी त्यांने म्हणाले छोटी भूमिका जरी करायची असेल तरी मला सांग मी तीही करायला तयार आहे. 

संजय दत्तच्या बायोपिकमध्ये रणबीर कपूर, अनुष्का शर्मा, परेश रावल, मनीषा कोइराला. करिश्मा तन्ना, दीया मिर्झा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट दिसंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजकुमार हिरानी यांचे चित्रपट पुस्तकांवरुन प्रेरणा घेऊन किंवा आयुष्यात आलेल्या अनुभवांवर आधारित आहे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अनेक कारणांमुळे राजकुमार हिरानी यांचा संजय दत्तच्या जीवनावर आधारित हा चित्रपट चर्चेत आहे. रणबीर कपूरने संजय दत्तची भूमिका साकार करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे तर सोनम कपूरने याआधी बायोपिकमध्ये काम केले आहे. नीरजा भानोत यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट सोनमने नीराज भानोत यांची भूमिका साकारली होती. याचित्रपटातील तिच्या अभिनयासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार ही देण्यात आला.    

Web Title: Sonam appears in Sanjay Dutt's biopic?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.