​सोनाली कुलकर्णीने शेअर केले दिल चाहता हैच्या वेळेचे सिक्रेट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 16:09 IST2017-08-10T10:39:31+5:302017-08-10T16:09:31+5:30

सोनाली कुलकर्णी हे नाव आज मराठी चित्रपटसृष्टीत अतिशय महत्त्वाचे मानले जाते. तिने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या ...

Sonalik Kulkarni shared the time with Dil Chahta Hai Secrets | ​सोनाली कुलकर्णीने शेअर केले दिल चाहता हैच्या वेळेचे सिक्रेट्स

​सोनाली कुलकर्णीने शेअर केले दिल चाहता हैच्या वेळेचे सिक्रेट्स

नाली कुलकर्णी हे नाव आज मराठी चित्रपटसृष्टीत अतिशय महत्त्वाचे मानले जाते. तिने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. मराठीप्रमाणेच बॉलिवूडमध्येदेखील तिने आपले प्रस्थ निर्माण केले आहे. मिशन काश्मीर, दिल चाहता है यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. दिल चाहता है हा चित्रपट सोनालीच्या करियरचा टर्निंग पॉईंट ठरला. या चित्रपटाने मला खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली असे सोनाली सांगते. 
दिल चाहता है या चित्रपटाला नुकतेच १६ वर्षं पूर्ण झाले. त्याबाबत बोलताना सोनालीने या चित्रपटाचे तिच्या आयुष्यातील महत्त्व सांगितले. ती सांगते, या चित्रपटात मी सैफच्या नायिकेची भूमिका साकारली होती. या चित्रपटाची कास्टिंग डायरेक्टर झोया अख्तर होती. झोयाने मला पूजा या भूमिकेसाठी विचारले होते. या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू व्हायच्या आधीच माझा मेकओव्हर करण्यात आला होता. कशा पद्धतीचे कपडे घालायचे, कोणत्या ड्रेसवर कोणती पर्स घ्यायची हे मला या चित्रपटामुळे कळायला लागले. या चित्रपटातील लडकी है कहाँ हे गाणे तर प्रेक्षकांना खूप आवडले होते. या गाण्याची कोरिओग्राफी फराह खानने केली होती. या गाण्यातील स्टेप्स खूपच गंमतीशीर होत्या. त्यामुळे आम्ही सगळे डान्स करताना एकमेकांकडे पाहून हसत होतो. पण हे गाणे प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. लोकांना आजही ते गाणे चांगलेच आठवणीत आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा अनुभव खूपच चांगला होता. आमिर खान, सैफ अली खान, अक्षय खन्ना हे तिघेही स्टार असले तरी ते सगळ्यांशी मिळून मिसळून वागत असत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी माझा वाढदिवस देखील आला होता. त्यांनी सगळ्यांनी मला न विसरता वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या होत्या. 

Also Read : सोनाली कुलकर्णीने केला ट्रेनने प्रवास

Web Title: Sonalik Kulkarni shared the time with Dil Chahta Hai Secrets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.