सोनाली बेंद्रेवर एकतर्फी प्रेम करणारा ‘हा’ पाकिस्तानी क्रिकेटपटू करणार होता तिचे अपहरण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 17:21 IST2017-12-26T11:51:44+5:302017-12-26T17:21:44+5:30

बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटपटू यांच्यातील अफेअर हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. नुकतेच क्रिकेटपटू विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री ...

Sonali Bendrey, the one-loving lover who was supposed to be Pakistani cricketer, kidnapped! | सोनाली बेंद्रेवर एकतर्फी प्रेम करणारा ‘हा’ पाकिस्तानी क्रिकेटपटू करणार होता तिचे अपहरण!

सोनाली बेंद्रेवर एकतर्फी प्रेम करणारा ‘हा’ पाकिस्तानी क्रिकेटपटू करणार होता तिचे अपहरण!

लिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटपटू यांच्यातील अफेअर हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. नुकतेच क्रिकेटपटू विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी लग्न करून, पुन्हा एकदा बॉलिवूड-क्रिकेट कनेक्शन चर्चेत आणले आहे. विरूष्काच्या अगोदर भारतीय क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज जहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांनी लग्न केले, तर क्रिकेटपटू युवराज सिंग आणि हेजल किच यांच्यातील अफेअर बºयाच काळ चर्चिले गेले. त्यामुळे बॉलिवूड आणि क्रिकेट क्षेत्राचे कनेक्शन कधीच लपून राहिले नाही. विशेष म्हणजे या यादीत काही पाकिस्तानी क्रिकेटर्सचाही समावेश आहे, जे बॉलिवूडमधील काही अभिनेत्रींवर अक्षरश: फिदा होते. त्यातीलच एक नाव म्हणजे पाकिस्तानचा माजी गोलंदाज रावलपिंडी एक्स्प्रेस शोअब अख्तर हे होय. जगभरातील फलंदाजांच्या मनात धडकी भरविणारा हा गोलंदाज मात्र बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीसमोर अक्षरश: क्लिन बोल्ड झाला होता. अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिच्यावर तो असा काही फिदा होता की, तिला बघताच त्याची स्पीड कमी व्हायची. त्यामुळेच एकेकाळी या दोघांच्या अफेअरची चर्चा प्रत्येकाच्या तोंडी होती. 

माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, शोएब अख्तर सोनालीला प्रचंड पसंत करायचा. तो नेहमीच तिचा फोटो आपल्याजवळ ठेवायचा. बºयाचदा त्याच्या सहकारी खेळाडूंनी ही बाब नोटीस केली होती. एका मुलाखतीदरम्यान, शोएबने स्वत: मान्य केले होते की, त्याला सोनाली खूप आवडते. भारत-पाकिस्तान सीरिजदरम्यान या दोघांची भेट झाली होती. मात्र शोएबचे हे एकतर्फी प्रेम होते. कारण सोनालीकडून शोएबला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. तिने कधीही शोएबवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. 



एका मुलाखतीदरम्यान शोएबने चेष्टामस्करीत म्हटले होते की, जर सोनालीने माझे प्रपोजल स्वीकारले नाही तर तिचे अपहरण करणार. असो, आता हे दोघेही विवाहित असून, त्यांच्या आयुष्यात खूश आहेत. सोनालीने दिग्दर्शक गोल्डी बहल यांच्यासोबत २००२ मध्ये लग्न केले, तर शोएबने २०१४ मध्ये रूबाब नावाच्या एका पाकिस्तानी मुलीशी लग्न केले. 

Web Title: Sonali Bendrey, the one-loving lover who was supposed to be Pakistani cricketer, kidnapped!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.