सोनाक्षी सिन्हाने पारदर्शक ड्रेस परिधान करताच युजर्सचा झाला संताप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2018 16:15 IST2018-04-11T10:45:01+5:302018-04-11T16:15:11+5:30

सोनाक्षी सिन्हाने लाल रंगाच्या पारदर्शक ड्रेसमधील एक फोटो शेअर करताच युजर्सनी तिला सुनावले. अनेकांनी तिला कुठे गेले तुझे संस्कार? असा प्रश्न केला.

Sonakshi Sinha wearing a transparent dress, the user became angry! | सोनाक्षी सिन्हाने पारदर्शक ड्रेस परिधान करताच युजर्सचा झाला संताप!

सोनाक्षी सिन्हाने पारदर्शक ड्रेस परिधान करताच युजर्सचा झाला संताप!

लिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर जबरदस्त अ‍ॅक्टिव असते. ती नियमितपणे तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे व्हिडीओज् आणि फोटो शेअर करीत असते. नुकताच तिने तिच्या अकाउंटवर असा एक फोटो शेअर केला, ज्यामुळे तिला अतिशय वाईट पद्धतीने ट्रोल केले जात आहे. वास्तविक सोनाक्षीला यापूर्वीही ट्रोल केले आहे. मात्र तिने नेहमीच ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे. यावेळेस त्याचे झाले असे की, सोनाक्षीने तिचा लाल रंगाच्या गाउनमधील एक फोटो शेअर केले. हा फोटो शेअर करतानाच तिने स्पष्ट केले की, हा फोटो जुलैमधील आहे. या फोटोमध्ये सोनाक्षी खूपच सुंदर दिसत आहे. परंतु युजर्सला तिचा हा फोटो अजिबातच पसंत आला नाही. 

युजर्सनी तिच्या या फोटोला कॉमेण्ट्स देताना तिला चीप म्हणून संबोधले. बºयाच युजर्सनी तर ‘तुझ्यावर संस्कार झाले नाहीत काय?’ असा तिला प्रतिप्रश्न केला. एका युजरने लिहिले की, ‘मॅम, तुम्हाला काय झाले?’ दुसºया युजरने लिहिले की, ‘नकली सोना’ काही युजर्सनी तर अतिशय अश्लील स्वरूपाच्या कॉमेण्ट्स दिल्या. अनेकांनी तिच्या परिवाराचे दाखले देत तुला असे शोभत नसल्याचे म्हटले. वास्तविक सोनाक्षीने शेअर केलेला हा ड्रेस ट्रान्सफर असून, त्यात ती खूपच हॉट दिसत आहे. 
 

दरम्यान, सोनाक्षी ‘रेस-३’मध्ये कॅमिओ करताना बघावयास मिळणार आहे. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटात सोनाक्षी साकिबच्या प्रेयसीच्या रूपात बघावयास मिळणार आहे. असे म्हटले जात आहे की, दोघे एप्रिल महिन्याच्या मध्यंतरात आपल्या सीक्वेंसची शूटिंग करणार आहे. त्याव्यतिरिक्त सोनाक्षी आगामी ‘दबंग-३’मुळे चर्चेत आहे. सुरुवातीला ती या चित्रपटात नसेल अशी चर्चा होती. परंतु आता ती ‘दबंग-३’मध्ये झळकणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. 

Web Title: Sonakshi Sinha wearing a transparent dress, the user became angry!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.