सोनाक्षी सिन्हा, दिलजीत दोसांझ आणि आदित्य रॉय कपूर दिसणार या चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2017 12:28 IST2017-06-26T06:58:18+5:302017-06-26T12:28:18+5:30

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, दिलजीत दोसांझ आणि आदित्या रॉय कपूर आपल्याला आगामी चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट रोमान्स, ...

Sonakshi Sinha, Diljeet Dosanjh and Aditya Roy Kapoor will appear in the film | सोनाक्षी सिन्हा, दिलजीत दोसांझ आणि आदित्य रॉय कपूर दिसणार या चित्रपटात

सोनाक्षी सिन्हा, दिलजीत दोसांझ आणि आदित्य रॉय कपूर दिसणार या चित्रपटात

लिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, दिलजीत दोसांझ आणि आदित्या रॉय कपूर आपल्याला आगामी चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट रोमान्स, कॉमेडी आणि ड्रामा यांनी भरलेला आहे. चित्रपटाचे शूटिंग याच वर्षी सुरु होणार आहे. विजक्राफ्ट ही इव्हेंट कंपनी याचित्रपटाच्या माध्यमातून प्रॉ़डक्शन क्षेत्रात पदार्पण करतेय. विज आणि वाशु भगनानी मिळून याचित्रपटाची निर्मिती करत आहेत.  विजक्राफ्ट ही आईफा अॅवॉर्ड ऑर्गनाज करणारी कंपनी आहे. या कंपनीचे संस्थापक राब्बास जोसेफ यांनी या गोष्टीला दुजोर दिला आहे की त्यांनी आपल्या पहिल्या चित्रपटासाठी सोनाक्षी सिन्हा, दिलजीत दोसांझ आणि आदित्य रॉय कपूर यांना साईन केले आहे. तसेच चित्रपटाची निर्मिती ते वाशु भगनानी यांच्यासोबत मिळून करतायेत. 

सोनाक्षी सध्या सिद्धार्थ मल्होत्रा इत्तेफाक चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दिग्दर्शक यश चोप्रा यांच्या 1962 साली प्रदर्शित झालेल्या इत्तेफात चित्रपटाचा रिमेक आहे. याचित्रपटाच्या शूटिंगला मुहूर्ताला बॉलिवूड बादशाह शाहरुख खान हजेरी लावली होती. याचित्रपटाची निर्मिती बी.आर. फिल्म्स, धर्मा प्रॉडक्शन आणि रेड चिलीज इंटरनेटमेंट मिळून करीत आहेत. इत्तेफाकचे दिग्दर्शन अभय चोप्रा करणार आहे. अभय चोप्रा हा बी.आर चोप्रा यांचा नातू आहे. या चित्रपटाच्या पहिल्या शॉटचा फोटो शाहरुख खानने शेअर केला आहे. दिलजीत दोसांझचा सुपर सिंह हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. तर आदित्य रॉय कपूरचा श्रद्धा कपूर बरोबर ओके जानू हा चित्रपट जानेवारी मध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारशी काही कमाल करता आली नव्हती.  

Web Title: Sonakshi Sinha, Diljeet Dosanjh and Aditya Roy Kapoor will appear in the film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.