रामासाठी काही पण..! रणबीर कपूरने 'रामायण'साठी केला या गोष्टींचा त्याग, वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 09:34 AM2023-10-10T09:34:29+5:302023-10-10T09:34:55+5:30

Ranbir Kapoor In Ramayan: अभिनेता रणबीर कपूर लवकरच नितीश तिवारीच्या रामायणमध्ये दिसणार आहे. या व्यक्तिरेखेसाठी रणबीर खूप मेहनत घेत आहे.

Something for Ram..! Ranbir Kapoor sacrificed these things for 'Ramayan', you will be speechless after reading this | रामासाठी काही पण..! रणबीर कपूरने 'रामायण'साठी केला या गोष्टींचा त्याग, वाचून व्हाल अवाक्

रामासाठी काही पण..! रणबीर कपूरने 'रामायण'साठी केला या गोष्टींचा त्याग, वाचून व्हाल अवाक्

googlenewsNext

बॉलिवूड रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या त्याच्या आगामी 'रामायण' चित्रपटामुळे चर्चेत आहे. नितीश तिवारीच्या चित्रपटात रणबीर भगवान रामाची भूमिका साकारणार आहे. मात्र, या चित्रपटाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. या चित्रपटाबाबत सतत चर्चा ऐकायला मिळत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्टार कास्ट चित्रपटासाठी त्यांची जीवनशैली बदलत आहे. इतकेच नाहीतर रणबीर कपूरने रामसारखे शुद्ध होण्यासाठी दारू आणि मांस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटात रणबीरसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात ती सीतेची भूमिका साकारणार आहे.

कोइमोईच्या रिपोर्ट्सनुसार, रणबीर दारू पिणे सोडत आहे आणि त्याच्या सार्वजनिक प्रतिमेसाठी नव्हे तर रामाच्या पात्राला न्याय देण्यासाठी नॉनव्हेज खाणेही सोडत आहे. रिपोर्टनुसार, चित्रपटाचे शूटिंग होईपर्यंत रणबीर दारू आणि मांसाहारापासून पूर्णपणे दूर राहणार आहे. रिपोर्टनुसार, रणबीरला रामसारखे शुद्ध आणि स्वच्छ वाटायचे आहे, म्हणूनच तो हे सर्व सोडून देत आहे. रणबीर लेट नाईट पार्टीही करत नाहीये.

शूटिंग कधी सुरू होणार?
पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, रणबीर पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला या चित्रपटाची शूटिंग सुरू करणार आहे. रणबीर आणि साई फेब्रुवारी २०२४ पासून शूटिंग सुरू करणार आहेत. या चित्रपटाच्या पहिल्या भागात प्रभू राम आणि सीता यांच्यावर अधिक लक्ष केंद्रित केले जाणार आहे. चित्रपटाचे शूटिंग ऑगस्ट २०२४ पर्यंत संपणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ऑस्कर विजेती कंपनी DNEG चित्रपटासाठी VFX बनवणार आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, रणबीर कपूरचा 'अॅनिमल' हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट १ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणबीरसोबत रश्मिका मंदाना, बॉबी देओल, अनिल कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
 

Web Title: Something for Ram..! Ranbir Kapoor sacrificed these things for 'Ramayan', you will be speechless after reading this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.