​आलिया भट्टने ‘एक्स बॉयफ्रेन्ड’ अर्जुन कपूरला टाळण्यासाठी केले असे काही!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2017 15:07 IST2017-05-04T09:37:28+5:302017-05-04T15:07:28+5:30

‘2 स्टेट्स’ या चित्रपटावेळी आलिया भट्ट आणि अर्जुन कपूर परस्परांच्या कमालीचे जवळ आले होते. यानंतर दोघांच्याही रिलेशनशिपची चर्चा रंगली ...

Some of the things that Alia Bhatt did to prevent 'ex boyfriend' Arjun Kapoor !! | ​आलिया भट्टने ‘एक्स बॉयफ्रेन्ड’ अर्जुन कपूरला टाळण्यासाठी केले असे काही!!

​आलिया भट्टने ‘एक्स बॉयफ्रेन्ड’ अर्जुन कपूरला टाळण्यासाठी केले असे काही!!

‘2
स्टेट्स’ या चित्रपटावेळी आलिया भट्ट आणि अर्जुन कपूर परस्परांच्या कमालीचे जवळ आले होते. यानंतर दोघांच्याही रिलेशनशिपची चर्चा रंगली होती.  त्यांची आॅनस्क्रीन केमिस्ट्री पाहून तर या चर्चेला आणखीच बळ मिळाले होते. अनेकांनी आलिया व अर्जुनचे नाव जोडले होते. अर्थात त्यावेळी दोघांनीही याचा इन्कार केला होता आणि मग चित्रपट रिलीज होतो ना होतो, तोच दोघेही आपआपल्या वाटेने चालते झाले होते.  कदाचित ती केमिस्ट्री, ती जवळीक सगळे काही प्रमोशनचा भाग होते. पण समजा असे असते तर आलिया व अर्जुनने आजघडीला एकमेकांना का टाळावे?



ALSO READ : आलिया भट्टला मिळाले जुळे भाऊ-बहीण

होय, अलीकडे प्रियांका चोप्राने भारतात दिलेल्या पार्टीतील दृश्य काहीसे असेच होते. आलिया व अर्जुन दोघेही एकमेकांना अक्षरश: टाळत होते. विशेषत: आलियाने या पार्टीत अर्जुनकडे स्पष्ट दुर्लक्ष केलेले दिसले. प्रियांकाच्या पार्टीत बॉलिवूडचे सगळे ए- लिस्ट सेलिब्रिटी जमले होते. आलिया भट्ट, सिद्धार्थ भट्ट, अर्जुन कपूर असे सगळे सगळे. सूत्रांच्या मते, या पार्टीत आलिया व तिचा कथित बॉयफ्रेन्ड सिद्धार्थ मल्होत्रा याच्यासोबत आली होती. तर अर्जुन त्याची बहीण अंशुला हिच्यासोबत पार्टीत पोहोचला होता. या पार्टीत अर्जुन व आलियाची नजरानजर झाली. पण ती तेवढ्या पुरतीच. अर्जुनसोबत बोलण्याच्या भानगडीत पडण्याऐवजी आलिया तिथून सटकली अन् पूर्णवेळ सिद्धार्थच्या अवतीभवती राहिली. अर्जुनही या पार्टीत सगळ्यांशी गप्पा करताना दिसला. पण आलियाने त्याला जवळ फटकू दिले नाही किंवा स्वत: अर्जुननेही आलियाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला नाही. आता याचे कारण काय,हे तर आलिया व अर्जुनलाच ठाऊक!

Web Title: Some of the things that Alia Bhatt did to prevent 'ex boyfriend' Arjun Kapoor !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.