विद्या सिन्हा यांच्या चित्रपटातील काही लोकप्रिय गाणी!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 02:32 PM2019-08-15T14:32:14+5:302019-08-15T14:33:54+5:30

बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री विद्या सिन्हा यांचे मुंबईतील क्रिटीकेअर रुग्णालयात निधन झाले आहे. छोटी सी बात, रजनीगंधा, पती पत्नी और वो या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रचंड गाजल्या. त्यांच्यावर चित्रीत गाणीही प्रचंड लोकप्रिय झालीत. त्यांची अशीच काही गाजलेली गाणी...

Some popular songs from Vidya Sinha's movie! | विद्या सिन्हा यांच्या चित्रपटातील काही लोकप्रिय गाणी!

विद्या सिन्हा यांच्या चित्रपटातील काही लोकप्रिय गाणी!

googlenewsNext
ठळक मुद्देविद्या सिन्हा यांनी ‘बिजली’ या मराठी चित्रपटात काम केले आहे. बहू रानी, हम दो हैं ना,भाभी आणि कवंजल सारख्या टीव्ही मालिकांमध्ये त्यांनी काम केले.

बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री विद्या सिन्हा यांचे मुंबईतील क्रिटीकेअर रुग्णालयात निधन झाले आहे. त्या ७२ वर्षांच्या होत्या. सिन्हा गेल्या काही वर्षांपासून हृदयविकार, फुफ्फुसांच्या आजाराने त्रस्त होत्या.  छोटी सी बात, रजनीगंधा, पती पत्नी और वो या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रचंड गाजल्या. त्यांच्यावर चित्रीत गाणीही प्रचंड लोकप्रिय झालीत. त्यांची अशीच काही गाजलेली गाणी...

 काव्यांजली, कबूल है, चंद्र नंदिनी, कुल्फी कुमार बाजेवाला यांसारख्या हिंदी मालिकांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. बॉलीवुड अभिनेत्री विद्या सिन्हा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९४७ मुंबई येथे झाला.

 

विद्या सिन्हा यांचे वडील राणा प्रताप सिंह हे फिल्म निर्मार्ते होते.  वयाच्या १८ व्या वर्षी त्यांनी ‘मिस मुंबई’चा किताब जिंकला होता.  

१९७४ साली आलेला ‘रजनीगंधा’ व ‘छोटीसी बात’ हे त्यांचे दोन सिनेमे प्रचंड गाजलेत. विद्या सिन्हा २०११ मध्ये सलमान खानच्या ‘बॉडीगार्ड’ चित्रपटात काम केले होते.

विद्या सिन्हा यांनी ‘बिजली’ या मराठी चित्रपटात काम केले आहे. बहू रानी, हम दो हैं ना,भाभी आणि कवंजल सारख्या टीव्ही मालिकांमध्ये त्यांनी काम केले.

 विद्या सिन्हा यांनी २००१ मध्ये ऑस्ट्रेलियातील डॉक्टर भीमराव साळुंके यांच्या बरोबर लग्न केले.

Web Title: Some popular songs from Vidya Sinha's movie!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.