​बेबी बम्पसोबत योग करताना दिसली सोहा अली खान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2017 14:43 IST2017-08-22T09:13:19+5:302017-08-22T14:43:19+5:30

बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान लवकरच आई होणार आहे. सध्या सोहा स्वत:चा प्रेग्नंसी पीरियड वेगळ्याच अंदाजात एन्जॉय करताना दिसतेय. ...

Soha Ali Khan appeared in Yoga with baby bump! | ​बेबी बम्पसोबत योग करताना दिसली सोहा अली खान!

​बेबी बम्पसोबत योग करताना दिसली सोहा अली खान!

लिवूड अभिनेत्री सोहा अली खान लवकरच आई होणार आहे. सध्या सोहा स्वत:चा प्रेग्नंसी पीरियड वेगळ्याच अंदाजात एन्जॉय करताना दिसतेय. होय, बेबी बम्पसोबत योग करतानाचे अनेक फोटो सोहा सध्या सोशल मीडियावर पोस्ट करतेय. यापूर्वी जागतिक योग दिनी सोहाने बेबी बम्पसोबत योगा करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.आता सोहाने पुन्हा एकदा असाच एक फोटो शेअर केला आहे. तासाभरापूर्वी पोस्ट झालेल्या या फोटोला आत्तापर्यंत १३ हजारांवर लाईक्स मिळाले आहेत.


बॉलिवूड स्टार्स आणि फिटनेस याचे खूप घट्ट नाते आहे. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी बॉलिवूड स्टार्स कुठलीही कसर सोडत नाही. बहुतांश स्टार्स स्वत:ला फिट ठेवण्यासाठी न चुकता योगाभ्यास करतात. सोहा सुद्धा यातलीच. अगदी पे्रेग्नंसीच्या काळातही सोहा न चुकता योग करताना दिसतेय.



अगदी काल-परवा सोहाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम झाला. सोहाची लाडकी वहिणी करिना कपूर, तिचा मुलगा तैमूर अली खान, करिश्मा कपूर, नेहा धूपिया, कोंकणा सेन असे सगळे सोहाच्या बेबी शॉवरमध्ये दिसले. या बेबी शॉवरचे फोटोही सध्या इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये सोहाने ब्ल्यू कलरचा गाऊन घातलेला आहे. यात ती कुठल्या राजकुमारीपेक्षा कमी दिसत नाहीय.

  काही दिवसांपूर्वीच सैफच्या बर्थ डे पार्टीतही सोहा दिसली होती. यावेळीही सोहाचा अंदाज बघण्यासारखा होता. तूर्तास, सोहा आणि तिचा हबी कुणाल खेमूच्या परिवारात आनंदी वातावरण असून सगळेजण सोहाच्या बाळाच्या येण्याची प्रतीक्षा करत आहेत.  सैफचा मुलगा तैमूर अगोदरच सगळ्यांचा जीव की प्राण बनला असताना सोहाचा चिमुकलाही सर्वांचा लाडका असेल यात शंका नाही. 

Web Title: Soha Ali Khan appeared in Yoga with baby bump!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.