​म्हणून इम्रान हाश्मीची पत्नी परवीन सहानीने मारली होती त्याच्या कानाखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 15:14 IST2017-10-24T09:44:45+5:302017-10-24T15:14:45+5:30

आपल्या पतीचा पहिला चित्रपट पाहिल्यावर कोणतीही पत्नी आनंदित होते. आपल्या पतीला मिठी मारून त्याचे कौतुक करते. पण तुम्हाला माहीत ...

So, under the ears of Imran Hashmi's wife Parvin had killed him | ​म्हणून इम्रान हाश्मीची पत्नी परवीन सहानीने मारली होती त्याच्या कानाखाली

​म्हणून इम्रान हाश्मीची पत्नी परवीन सहानीने मारली होती त्याच्या कानाखाली

ल्या पतीचा पहिला चित्रपट पाहिल्यावर कोणतीही पत्नी आनंदित होते. आपल्या पतीला मिठी मारून त्याचे कौतुक करते. पण तुम्हाला माहीत आहे का, इम्रान हाश्मीचा पहिला चित्रपट पाहिल्यावर त्याची पत्नी परवीन सहानीने चक्क त्याच्या कानाखाली वाजवली होती. एवढेच नव्हे तर इम्रानच्या अनेक चित्रपटाच्या स्क्रिनिंगनंतर इम्रानला कानाखाली खावी लागली आहे. इम्रान आणि त्याच्या पत्नीनेच ही गोष्ट मीडियाला सांगितली आहे.
इम्रान हाश्मी हा सिरियल किसर म्हणून ओळखला जातो. मर्डर या चित्रपटापासूनच प्रत्येक चित्रपटात आपल्याला त्याचे किसिंग सीन पाहायला मिळाले आहेत. इम्रानने एखाद्या चित्रपटात किसिंग सीन दिला नाही तर त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. पण त्याने चित्रपटात किसिंग सीन देणे त्याच्या पत्नीला पसंत नाहीये. इम्रान आणि परवीन यांचे लव्ह मॅरेज आहे. तो या झगमगत्या दुनियेशी संबंधित असला तरी त्याच्या पत्नीचा या क्षेत्राशी काहीही संबंध नाहीये. त्याची पत्नी ही टिचर आहे. इम्रानने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या आधीपासूनच इम्रान आणि परवीन यांचे अफेअर होते. ती इम्रानच्या स्ट्रगलच्या काळात नेहमीच त्याच्या पाठिशी उभी राहिली आहे. त्यांनी साडे सहा वर्षांच्या अफेअरनंतर २००६ मध्ये लग्न केले. 
इम्रानने आणि त्याच्या पत्नीने एका आंतरराष्ट्रीय मासिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, परवीन ही इम्रानच्या बाबतीत खूपच पझेसिव्ह आहे. त्यामुळे त्याने स्क्रीनवर किस करू नये असे तिने अनेकवेळा इम्रानला सांगितले आहे. पण इम्रानची इमेजच सिरियल किसरची बनल्यामुळे चित्रपटाच्या दृश्याच्या मागणीनुसार त्याने किस करणे हे गरजेचे असते. पण त्याने किस करताना परवीनने पाहिल्यावर तिची तळपायाची आग मस्तकात जाते. इम्रानचा पहिला चित्रपट पाहून तर परवीन इतकी चिडली होती की, तिने त्याच्या कानाखाली वाजवली होती. एवढेच नव्हे तर इम्रानच्या अनेक चित्रपटांच्या ट्रायल शो नंतर इम्रानचा किसिंग सीन पाहून चिडलेल्या परवीनने त्याच्या कानाखाली मारली आहे.
इम्रान आणि परवीनने मुस्लीम पद्धतीने विवाह केला होता. इम्रानचे वडील मुस्लीम असून त्याची आई ख्रिश्चन आहे. परवीन आणि इम्रान बॉलिवूडमधील क्यूट कपलमधील एक कपल असून त्या दोघांना अनेक पार्टी, पुरस्कार सोहळ्यांना एकत्र पाहाता येते. 
 
Also Read : ​या अभिनेत्याने केले आहे स्कूल टिचरशी लग्न

Web Title: So, under the ears of Imran Hashmi's wife Parvin had killed him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.