​-म्हणून गॅलेक्सी अपार्टमेंटसोडून सलमान खानला कुठेही जायचे नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2017 10:46 IST2017-06-04T05:09:43+5:302017-06-04T10:46:43+5:30

सलमान खान सध्या ‘ट्यूबलाईट’ या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये प्रचंड व्यस्त आहे. सलमानचा प्रत्येक चित्रपट त्याच्या चाहत्यासाठी कुठल्या भेटवस्तूपेक्षा ...

-So Salman Khan does not want to go anywhere from Galaxy Apartments! | ​-म्हणून गॅलेक्सी अपार्टमेंटसोडून सलमान खानला कुठेही जायचे नाही!

​-म्हणून गॅलेक्सी अपार्टमेंटसोडून सलमान खानला कुठेही जायचे नाही!

मान खान सध्या ‘ट्यूबलाईट’ या त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये प्रचंड व्यस्त आहे. सलमानचा प्रत्येक चित्रपट त्याच्या चाहत्यासाठी कुठल्या भेटवस्तूपेक्षा कमी नसतो. मध्यंतरी ‘ट्यूबलाईट’चा ट्रेलर लॉन्च झाला आणि चाहते सलमानच्या वांंद्रास्थित गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर ढोल-ताशे घेऊन पोहोचले होते.  सलमानवर होणाºया चाहत्यांच्या प्रेमाच्या या वर्षावाचे गॅलेक्सी अपार्टमेंट गेल्या अनेक वर्षांपासून साक्षीदार राहिले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सलमान या अपार्टमेंटमध्ये राहतोय. खरे तर गॅलेक्सी अपार्टमेंट सलमानच्या मानाने तसे फारच लहान. सलमानने मनात आणले तर एका दिवसात तो एखाद्या अलिशान बंगल्यात शिफ्ट होऊ शकेल. पण असे असूनही सलमान हे अपार्टमेंट सोडू इच्छित नाही. शेवटी यामागे काय कारण असावे? अलीकडे एका शोमध्ये सलमानने या प्रश्नाचे उत्तर दिले.





मी माझ्या आई-वडिलांसोबत राहू इच्छितो. त्यांना सोडून मी कुठल्याही बंगल्यात शिफ्ट होणार नाही. एखाद्या मोठ्या अलिशान बंगल्यापेक्षा हे अपार्टमेंट मला प्राणापलिकडे प्रिय आहे. कारण याठिकाणी माझे आई-बाब राहतात. मी लहानपणापासून याठिकाणी राहिलो आहे. या अपार्टमेंटमधील सगळी माणसं माझ्या कुटुंबासारखे आहेत. आम्ही लहान होतो तेव्हा खालच्या गार्डनमध्ये तासन् तास खेळायचो. अनेकदा तर गार्डनमध्येच झोपी जायचो. आमच्यासाठी अपार्टमेंटमधील सगळी घरे आमचीच घरे होती. कुठल्याही, कुणाच्याही घरात जायचो. जेवायचो, खेळायचो. गॅलेक्सी अपार्टमेंटशी माझ्या अनेक आठवणी जुळल्या आहेत. हे घर सोडून मला कुठेच जायचे नाही. मी कायम इथेच राहू इच्छितो, असे सलमान म्हणाला.



सलमान खानचा ‘ट्यूबलाईट’ ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होतो आहे. यात सलमानचा भाऊ सोहेल खान आणि चीनी अभिनेत्री झू झू यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Web Title: -So Salman Khan does not want to go anywhere from Galaxy Apartments!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.