म्हणून 'सरकार-3' सिनेमा पाहावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2017 15:03 IST2017-05-11T08:28:52+5:302017-05-11T15:03:32+5:30

रुपेरी पडद्यावर पुन्हा एकदा बिग बी अमिताभ बच्चन आणि दिग्दर्शक रामगोपाल वर्मा एकत्र येत आहेत. सरकार-3 सिनेमाच्या निमित्ताने नऊ ...

So look at the 'Government-3' movie | म्हणून 'सरकार-3' सिनेमा पाहावा

म्हणून 'सरकार-3' सिनेमा पाहावा

पेरी पडद्यावर पुन्हा एकदा बिग बी अमिताभ बच्चन आणि दिग्दर्शक रामगोपाल वर्मा एकत्र येत आहेत. सरकार-3 सिनेमाच्या निमित्ताने नऊ वर्षांनंतर ही जोडी बॉक्स ऑफिसवर जादू करण्यासाठी सज्ज झाली आहे. या सिनेमाचा पहिल्या ट्रेलरनेच जोरदार धमाका उडवून दिला होता. या ट्रेलरची सुरुवातच बिग बींच्या दमदार डायलॉगने झाली होती. "ये आदमी तब तक नही हारेगा जब तक जनता उसकी तरफ है" ट्रेलरमधीलच याच डायलॉगने सरकार-3 हा सिनेमा कसा असेल झाली एक झलक फॅन्सना दाखवली होती. दोन मुलं गमावलेल्या बिग बींचा एंग्री लूक रुपेरी पडदा पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहे. 

सिनेमाची दमदार स्टारकास्ट 

मनोज बाजपेयी, जॅकी श्रॉफ, यामी गौतम, अमित साध आणि रोनीत रॉय हे 'सरकार' सिनेमाच्या या सिक्वेलमध्ये नव्याने दाखल झालेले दमदार कलाकार आहेत. जॅकी श्रॉफ आणि मनोज बाजपेयी आपल्या खलनायकाच्या भूमिकेतून रसिकांवर जादू करण्यासाठी सज्ज आहेत. अमित साध आणि यामी या दोघांनीही आपल्यात अभिनय कौशल्य असल्याचे दाखवून दिलं आहे. त्यामुळे 'सरकार' टीममध्ये दाखल झालेली ही नवी स्टारकास्ट नक्कीच एक आकर्षणाचा विषय असणार आहे. 

महानायकाचा दमदार अभिनय

'पिंक' या सिनेमातील दमदार परफॉर्मन्सनंतर बॉलीवुडचे 'शहेनशाह' रुपेरी पडद्यावर सुभाष नागरे बनून अवतरणार आहेत. नेहमीप्रमाणे बिग बींनी ही भूमिका मोठ्या खुबीने साकारली आहे. शिवाय सरकार-3 या सिनेमात महानायकानं गणेश आरतीसुद्धा गायली आहे. ही गणेश आरती 'सरकार-3' सिनेमाचं एक मुख्य आकर्षण आहे. 

जॅकी श्रॉफ खलनायकाच्या भूमिकेत 

बॉलिवूडचा 'भिडू' जॅकी श्रॉफ पुन्हा एकदा बिग बी अमिताभ यांच्यासह सरकार-3 सिनेमातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. दशकभरापूर्वी बॉक्स ऑफिसवर रिलीज झालेल्या एकलव्य या सिनेमानंतर दोघं पुन्हा एकदा एकत्र येत आहेत.'सरकार-3' सिनेमात जॅकी मायकल वाल्या ही भूमिका साकारत असून सुभाष नागरेचा तो कट्टर विरोधक असतो. सामर्थ्य आणि वर्चस्वाच्या लढाईत सुभाष नागरेंसमोर रुपेरी पडद्यावर जॅकी श्रॉफ आणि मनोज बाजपेयी यांनी साकारलेल्या भूमिका मोठं आव्हान निर्माण करतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

सिनेमाची उत्कंठावर्धक कथा

'सरकार' आणि 'सरकारराज' सिनेमाप्रमाणेच 'सरकार-3' सिनेमातही 'सरकार' प्रतिकूल परिस्थितीशी लढा देताना पाहायला मिळणार आहे.मायकल वाल्या (जॅकी श्रॉफ) आणि गोविंद देशपांडे (मनोज बाजपेयी) यांच्यासह सुभाष नागरेंची राजकीय वर्चस्वाची लढाई रंगणार आहे. परकीयांशी लढा देणा-या सुभाष नागरेंसमोर स्वकीयांचंही आव्हान उभं ठाकल्याचे सरकार-3 सिनेमात पाहायला मिळणार आहे. सुभाष नागरेंना हे आव्हान दुसरा तिसरा कुणी देणार नसून खुद्द त्यांचा नातू शिवाजी नागरे (अमित साध) याच्याकडून मिळणार आहे. वैयक्तीक मतभेदांमुळे आजोबा आणि नातवामध्ये संघर्ष रंगणार आहे. 

सरकारचा वारसदार

सरकार सिनेमाची कथा ही 1972 साली रिलीज झालेल्या 'द गॉडफादर' या सिनेमावर बेतली होती.बिग बी अमिताभ बच्चन यांनी साकारलेली सुभाष नागरे ही व्यक्तीरेखा महाराष्ट्राच्या राजकारणातील वजनदार नाव असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित असल्याचे बोललं गेलं. सरकार आणि सरकारराज या दोन्ही सिनेमांना रसिकांसह समीक्षकांची दाद मिळाली होती. आता महानायक अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाची जादू असलेला सरकार-3 पुन्हा एकदा रसिकांवर गारुड घालण्यासाठी सज्ज आहे. 

Web Title: So look at the 'Government-3' movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.