SO HOT : वरूण धवनचा हॉट अंदाज!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2017 13:24 IST2017-01-27T07:54:50+5:302017-01-27T13:24:50+5:30
‘बॉलिवूडचा चॉकलेट बॉय’ अभिनेता वरूण धवन हा ‘बद्रिनाथ की दुल्हनियाँ’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच त्याने त्याचा एक हॉट फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलाय. वर्कआऊट करतानाचा वरूण किती हॉट दिसतो ते पाहा या फोटोत...

SO HOT : वरूण धवनचा हॉट अंदाज!!
‘ ्टुडंट आॅफ दी इअर’ मधून डेब्यू करणारा अभिनेता वरूण धवन सध्या ‘बद्रिनाथ की दुल्हनियाँ’ आणि ‘जुडवा २’ या चित्रपटांसाठी चर्चेत आहे. मिळालेल्या प्रोजेक्टमध्ये जीव ओतून काम करणे हे वरूणच्या काम करण्याचे खरे वैशिष्टय आहे. सध्या तो ‘जुडवा २’ या चित्रपटासाठी विशेष मेहनत घेताना दिसतोय. नुकतेच त्याने वर्कआऊट करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. वर्कआऊट सेशनवेळी त्याचे दिसत असलेले पिळदार दंड आणि शेप्ड बॉडी कुणालाही प्रेमात पाडेल अशीच आहे.
वरूण धवनचे वडील दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी १९९७ मध्ये ‘जुडवा’ चित्रपट रिलीज केला होता. सलमान खानसोबत अभिनेत्री करिश्मा कपूर आणि अभिनेत्री रंभा यांची केमिस्ट्री सर्वांना आवडली. हा चित्रपट सर्वांना एवढा आवडला की, त्याचा सिक्वेल केव्हा येणार? अशी प्रतिक्षा सर्वजण करत आहेत. आता चित्रपटाचा सिक्वेल काढायचा म्हटल्यास त्यात काम करण्यासाठी अनेक कलाकार तयार होते. मात्र, अभिनेता वरूण धवनला यात मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत घेण्यात आले आहे. त्याला चित्रपटात दुहेरी भूमिका साकाराव्या लागणार आहेत. या चित्रपटात तापसी पन्नू आणि जॅकलीन फर्नांडिस या दोन अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. पाहूयात, ही नवीन कलाकारी प्रेक्षकांना किती आवडतेय ते!!!