​- म्हणून अक्षय कुमारने वैष्णो देवीच्या दर्शनाला जाणे केले बंद !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2017 15:42 IST2017-05-02T10:11:39+5:302017-05-02T15:42:53+5:30

अक्षय कुमार माता वैष्णोदेवीचा खूप मोठा भक्त आहे, हे आपण जाणतोच. अगदी आत्ताआत्तापर्यंत दर सहा महिन्यांनी अक्षय वैष्णोदेवीच्या दर्शनला ...

- So Akshay Kumar stopped going to Vaishno Devi's Darshan! | ​- म्हणून अक्षय कुमारने वैष्णो देवीच्या दर्शनाला जाणे केले बंद !

​- म्हणून अक्षय कुमारने वैष्णो देवीच्या दर्शनाला जाणे केले बंद !

्षय कुमार माता वैष्णोदेवीचा खूप मोठा भक्त आहे, हे आपण जाणतोच. अगदी आत्ताआत्तापर्यंत दर सहा महिन्यांनी अक्षय वैष्णोदेवीच्या दर्शनला जायचा. एकटा नाही तर आपल्या संपूर्ण स्टाफसह वैष्णोदेवीच्या दरबारात जाण्याचा त्याचा नेम कधीच चुकायचा नाही. पण आता अक्षय असे करत नाही. यामागचे कारण काय, तर आता मातेच्या दर्शनला इतका दूरचा प्रवास करण्याची त्याला गरज नाही. कारण त्याला इथेच मातेचे दर्शन होते. होय, गरिब, वंचित, गरजूंमध्ये अक्षयला देवदर्शन घडतं. 
  कुठल्याही गरिबाला मदत करून अक्षयला बसल्याजागी मातेचे दर्शन घडते. अक्षयने याबद्दल सांगितले की, मी दर सहा महिन्याला वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जम्मू काश्मिरला जायचो. या प्रत्येक टूरवर दोन ते तीन लाख रुपए खर्च व्हायचे. याशिवाय येण्या-जाण्याचा खर्च आणि हॉटेलचा खर्च वेगळा. एक दिवस अचानक, हे तीन-चार लाख रुपए एखाद्या गरजूला का देऊ नये,असा प्रश्न माझ्या मनात आला. यानंतर मी असेच केले आणि मी ज्या ज्या गरजूला मदत केली, त्या त्या गरजूत मला वैष्णोदेवीचे दर्शन घडू लागले. वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जम्मू काश्मिरला जाण्याची गरज नाही, हे मला जाणवले. 
अक्षय कुमार ‘पॅडमॅन’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.  या चित्रपटात अरुणाचलम मुरुगनाथम यांच्या जीवनाचा संघर्ष व स्वस्त सॅनिटरी पॅड तयार करण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्यापही निश्चित झाली नसली तरीही चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मात्र कमालीची उत्सुकता पाहायला मिळतेय.  

Web Title: - So Akshay Kumar stopped going to Vaishno Devi's Darshan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.