म्हणून अजय देवगणने स्वीकारला ‘तानाजी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2017 11:14 IST2017-10-14T04:48:33+5:302017-10-14T11:14:46+5:30

सध्या अभिनेता अजय देवगण त्याचा आगामी चित्रपट गोलमला अगेनच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दिवालीच्या मुहुर्तावर अजयचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला ...

So Ajay Devgan accepted 'Tanaji' | म्हणून अजय देवगणने स्वीकारला ‘तानाजी’

म्हणून अजय देवगणने स्वीकारला ‘तानाजी’

्या अभिनेता अजय देवगण त्याचा आगामी चित्रपट गोलमला अगेनच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दिवालीच्या मुहुर्तावर अजयचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा रोहित शेट्टी आणि अजय देवगणच्या जोडीचा गोलमाल सीरिजचा चौथा चित्रपट आहे. या चित्रपटाकडून गोलमालच्या टीमला खूप अपेक्षा आहेत. यानंतर अजय देवगण राजकुमार गुप्ताच्या 'रेड' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. रेडची शूटिंग पूर्ण झाल्यानंतर अजय तयारीला लागणार आहे तो  ‘तानाजी : द अनसंग वॉरिअर’चित्रपटाच्या तयारीला. अजय यात यात तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘गड आला पण सिंह गेला,’ असे म्हणत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या आठवणीने हळहळतात त्याच तानाजी मालुसरे यांचा ऐतिहासिक पराक्रम आपण पडद्यावर पाहू शकणार होता.

एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखती दरम्यान अजयने स्पष्ट केले की हा चित्रपट त्याने एका खास कारणामुळे स्वीकारला आहे. अजय म्हणाल की,  तानाजी ही अप्रतिम व्यक्तिरेखा आहे. मी अशी व्यक्तिरेखा आजपर्यंत पाहिली नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य खूप मोठे आहे. पण हे कार्य करताना त्यांना तानाजीसारख्या अनेक शिलेदारांची मोलाची साथ लाभली. आज सारेच महाराजांबद्दल बोलतात, पण तानाजी यांच्याबद्दल फार कोणी बोलत नाही. अशी व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर आणणे हे फार आव्हानात्मक काम आहे. माझ्यासमोर अनेक आव्हान आहेत. मात्र त्याला विश्वास आहे तो ती पार करेल.


अजय पुढे म्हणाला की, चित्रपटासाठीच तयारी विशेष पद्धतीने सुरु करण्यात येणार आहे. याचित्रपटासाठी तो शरीरयष्टीवर बरीच मेहनतसुद्धा घेणार आहे. चित्रपटात स्पेशल इफेक्टसचा वापरही करण्यात येणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना कसा वाटतो हेच पाहावे लागले. 

ALSO READ :  गोलमाल अगेनमुळे नाही तर या कारणामुळे खास आहे अजय देवगणची दिवाळी

ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटाचा फर्स्ट लूक काही महिन्यांपूर्वी रिलीज करण्यात आला आहे. कोंढाणा जिंकूण आणण्यासाठी तानाजींनी प्राणांची बाजी लावली होती. तानाजी हे बारा हजार हशमांचे (पायदळ) सुभेदार होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा घेतली. 

Web Title: So Ajay Devgan accepted 'Tanaji'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.