बिग बी सोबत काम करून अभिनेता फरहान अख्तर खूप आनंदात आहे. 'वजीर' चित्रपटात हे दोघे एकत्र आहे. ४१ वर्षीय ...
‘फरहान’च्या आनंदापुढे आकाश ठेंगणे
/>बिग बी सोबत काम करून अभिनेता फरहान अख्तर खूप आनंदात आहे. 'वजीर' चित्रपटात हे दोघे एकत्र आहे. ४१ वर्षीय फरहानने यापूर्वी 'पिकू' दिग्दर्शित केलेला आहे. 'लक्ष्य' मध्ये अभिनय ही केला आहे. फरहान म्हणाला, अमिताभ बच्चन यांच्यासोबत मी खूप चर्चा केली. आम्ही सर्व बालपणापासून त्यांचे चाहते आहोत. त्यांचे चित्रपट पाहातच आम्ही लहानाचे मोठे झालो आहोत. मी त्यांच्या 'दिवार'आणि इतर चित्रपटांविषयी त्यांच्या आठवणी जाणून घेतल्या. सलीम-जावेद या जोडीसोबत असलेल्या त्यांच्या नात्याविषयी त्यांनी बरेच काही सांगितले. अमिताभ हे फारच विनोदी सुद्धा आहेत. 'वजीर'मध्ये नील नितीन मुकेशसुद्धा भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी विधू विनोद चोप्रा त्याच्याकडे गेले तेव्हा तो फार उदास होता. पण, नंतर त्याने काम करण्याचा निर्णय घेतला. आदिती राव आणि जॉन अब्राहम यांच्याही यात विशेष भूमिका आहेत. 'वजीर'चे लेखक अभिजात जोशी यांनी यापूर्वी ' पीके' आणि ' थ्री इडियट्स' या चित्रपटांचे लेखन केले आहे.
Web Title: The sky pauses after the joy of 'Farhan'