​दिग्गजांच्या मांदियाळीत गायिका सोफी चौधरी करणार रॅम्पवॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2017 20:42 IST2017-02-02T15:12:25+5:302017-02-02T20:42:25+5:30

दिग्गजांच्या मांदियाळीत गायिका सोफी चौधरी करणार रॅम्पवॉक बॉलिवूड अभिनेत्री व गायिका सोफी चौधरी ‘लॅक्मे फॅशन वीक’च्या समर रिसॉर्ट २०१७ ...

Singer Sophie Choudhary will be honored by Rampaul | ​दिग्गजांच्या मांदियाळीत गायिका सोफी चौधरी करणार रॅम्पवॉक

​दिग्गजांच्या मांदियाळीत गायिका सोफी चौधरी करणार रॅम्पवॉक

ग्गजांच्या मांदियाळीत गायिका सोफी चौधरी करणार रॅम्पवॉक
बॉलिवूड अभिनेत्री व गायिका सोफी चौधरी ‘लॅक्मे फॅशन वीक’च्या समर रिसॉर्ट २०१७ मध्ये डिझायनर आभा चौधरीसाठी रॅम्प वॉक करताना दिसणार आहे. आभा चौधरी पहिल्यांदाच ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये आपले केलक्शन सादर करणार आहे. आभा चौधरीच्या ‘कोरल १०१’ या कलेक्शनचे सादरीकरण सोफ ी करणार आहे. ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये दिग्गज बॉलिवूड सेलिब्रेट्रीस हजेरी लावणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे दिग्गजांच्या मांदियाळीत सोफी चौधरी आपला जलवा दाखविणार आहे. 



आपल्या खास स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेली सोफी चौधरी ही बॉलिवूडमधील सर्वांत अ‍ॅक्टिव्ह सेलिब्रेटींपैकी मानली जाते. सोफी म्हणाली, मला रॅम्पवर वॉक करणे माझ्या आवडत्या कामांपैकी एक आहे. हे वीस हजार लोकांसमोर सादरीकरण करण्यासाररखे वाटते. हे त्याहून अधिक जोखिमेचे आहे. ‘लॅक्मे फॅशन वीक’ हा देशातील सर्वांत मोठ्या फॅशन आयोजनापैकी एक आहे. यात सहभागी होणे माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. आभा चौधरी हिच्यासाठी वॉक करताना मला आनंद होत आहे.  मी या शोमध्ये आभासाठी शो स्टॉपर म्हणून हजेरी लावणार आहे. 



‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये अनेक दिग्गज बॉलिवूड स्टार्स हजेरी लावणार आहे. ‘स्प्लॅश’ या ब्रॅण्डसाठी सलमान खानची कथित गर्लफ्रेण्ड युलिया वेंटर शोस्टॉपर असेल तर करिना कपूर देखील आपल्या प्रेग्नेंसी नंतर प्रथमच लॅक्मे फॅ शन वीकमधून रॅम्पवर परतणार आहे. यासोबतच प्रसिद्ध मॉडेल पद्मालक्ष्मी, बॉलिवूड अभिनेत्री व फॅशन दिवा नेहा धुपिया व डिझायनर ते अभिनेत्री अशी ओळख मिळविणारी सोनाक्षी सिन्हा ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये रॅम्पवर आपला जलवा दाखवतील. ‘बद्रिनाथ की दुल्हनीया’ व ‘जॉली एलएलबी२’ हे चित्रपट लवकरच रिलीज होणार असल्याने आलिया भट्ट आणि हुमा कुरेशी देखील लॅक्मे फॅशन वीकमध्ये हजेरी लावू शकतात, असेही सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे या दोन्ही अभिनेत्रींची स्वत:ची स्टाईल स्टेटमेंट आहे. 

Web Title: Singer Sophie Choudhary will be honored by Rampaul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.