टायगर श्रॉफची हिरोइन निधी अग्रवालने केला नवा चित्रपट साइन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 14:02 IST2017-09-07T08:14:30+5:302017-09-07T14:02:15+5:30
निधी अग्रवालने टायगर श्रॉफसोबत मुन्ना मायकलमधून आपल्या करिअरची सुरुवात केली पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला. पहिलाच चित्रपट आणि ...
.jpg)
टायगर श्रॉफची हिरोइन निधी अग्रवालने केला नवा चित्रपट साइन
न धी अग्रवालने टायगर श्रॉफसोबत मुन्ना मायकलमधून आपल्या करिअरची सुरुवात केली पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला. पहिलाच चित्रपट आणि तो फ्लॉप होणे म्हणजे फिल्म इंडस्ट्री मध्ये कमबॅक करणे अवघड असते पण याबाबतीत निधी नशीबवान ठरली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार निधी लवकरच किअर्ज एंटरटेनमेंट च्या बॅनर खाली झळकणार आहे, किअर्ज एंटरटेनमेंटने आतापर्यंत रुस्तम , टॉयलेट एक प्रेम कथा सारखे चित्रपट तयार केले आहेत. निधीला या बाबतीत विचारले असता तिने ही बातमी खरी असल्याचे सांगितले, ती म्हणाली की हो हे खरे आहे की मी किअर्ज एंटरटेनमेंट बरोबर एका प्रोजेक्टवर काम करते आहे पण आता मी त्याबद्दल काही सांगू शकत नाही. आता निधी बरोबर कोणत्या अभिनेत्याचा नंबर लागतो हे लवकर कळेल.
ALSO READ : टायगर श्रॉफ आणि दिशा पटानीच्या 'बागी2' चे शूटिंग सुरू
जर आपण टायगर श्रॉफचा विचार केला तर तो सध्या 'बागी २'साठी मेहनत घेताना दिसतो आहे, हा चित्रपट त्याच्याच बागी चित्रपटाचा सिक्वेल आहे. या सिक्वेल ध्ये त्याच्यासोबत श्रद्धा कपूर नसून दिशा पटानी झळकणार आहे. नुकताच दिशा आणि टायगरने सोशल मीडिया वर व्हिडिओ शेअर केला त्यात ते 'बागी २'साठी वर्कआऊट करताना दिसला. टायगर आणि दिशाचे फॅन्स या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत असतील यात काही शंका नाही. 2018मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दोघांची ऑनस्किन केमिस्ट्री बघण्याची उत्सुकता प्रेक्षकांनामध्ये असणार आहे. या आधी दिशा आणि टायगरमधील केमिस्ट्री ‘बेफिकरा’ या गाण्यात आपण बघितलीच आहे. बागी-२’ चित्रपटाचे दिग्दर्शन अहमद खान करीत आहे.